esakal | माय जर्नी : स्वप्न उतरलं सत्यात...
sakal

बोलून बातमी शोधा

sharwari-wagh

मी १६ वर्षांची असताना, म्हणजेच रुपारेल महाविद्यालयात अकरावीत शिकत असतानाच अभिनय क्षेत्रामध्ये आले. त्या वेळी ‘फ्रेश फेस’ ही स्पर्धा आयोजित केली होती. आमच्या लॅबच्या शिक्षिकेने सांगितले, की जे कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी होईल, त्यांची हजेरी लावली जाईल. त्यासाठी मी त्या स्पर्धेत सहभागी झाले. मी खूप मेहनत घेतली आणि जिंकलेही. त्यामुळे मला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली, ऑडिशन्ससाठी फोन येऊ लागले.

माय जर्नी : स्वप्न उतरलं सत्यात...

sakal_logo
By
शर्वरी, अभिनेत्री

मी मूळची मुंबईची आहे. मला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती, त्यामुळे मी शिबिरांमध्येही सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी १६ वर्षांची असताना, म्हणजेच रुपारेल महाविद्यालयात अकरावीत शिकत असतानाच अभिनय क्षेत्रामध्ये आले. त्या वेळी ‘फ्रेश फेस’ ही स्पर्धा आयोजित केली होती. आमच्या लॅबच्या शिक्षिकेने सांगितले, की जे कोणी या स्पर्धेमध्ये सहभागी होईल, त्यांची हजेरी लावली जाईल. त्यासाठी मी त्या स्पर्धेत सहभागी झाले. मी खूप मेहनत घेतली आणि जिंकलेही. त्यामुळे मला जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली, ऑडिशन्ससाठी फोन येऊ लागले. विशेष म्हणजे, त्याचदरम्यान मला तीन चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ‘प्यार का पंचनामा-२’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे करतानाच मी चित्रपट, मालिका, जाहिराती व वेबसीरिजसाठी ऑडिशन्स देत होते. 

मला मोठा ब्रेक डिसेंबर २०१७मध्येच मिळाला, तो ॲमेझॉनवरील ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरिजद्वारे. यामध्ये मी ‘माया’ ही भूमिका साकारली. ही वेबसीरिज माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली. माझा दुसरा प्रोजेक्‍ट ‘बंटी और बबली’ खूपच धमाल आहे. मी लहान असताना ज्या वेळी हा चित्रपट पाहिला होता, त्या वेळी मी राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनची फॅनच झाले. त्यानंतर मी राणीसारखे कपडेही शिवले. आता या सर्वांबरोबर काम करायला मिळणार असून, आम्ही सेटवर खूपच धमाल करत आहोत.

आजकाल चित्रपट व वेबसीरिजमध्ये फारसे अंतर राहिलेले नाही. प्रेक्षक नेहमीच चांगले काम, चांगले पात्र, चांगली कथा पाहतात, त्यामुळे पहिल्यांदा वेबसीरिज करायची की चित्रपट, हे माझ्या मनात आले नाही. मला फक्त चांगले काम हवे होते. मला वेबसीरिज व चित्रपटही मिळाले. माझे आई-बाबा अकरावीपासूनच माझ्या आवडीकडे पाहत होते. ‘फ्रेश फेस’ या स्पर्धेसाठी मी किती मेहनत घेतली, याची जाणीव त्यांना होती. त्यातच मी विज्ञान शाखा निवडली होती. त्या वेळी आई-बाबांनी मला सांगितले, ‘‘तुला अभिनयामध्ये रस आहे, त्यामुळे पहिल्यांदा तू पदवी पूर्ण कर त्यासोबतच त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घे, नृत्याचे क्‍लास लाव. त्यात तू पूर्णपणे स्वतंत्र ओळख निर्माण कर. दोन दगडांवर पाय ठेवू नको. एकाच क्षेत्रात मोठी हो.’’ आई-वडिलांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच मी अभिनय क्षेत्रामध्ये आले असून, आता माझे स्वप्न पूर्ण करत आहे. आगामी काळातही मला खूप मोठी झेप घ्यायची आहे. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

loading image