गोष्ट संस्मरणीय प्रवासाची...

कपिलाश्रम येधील शंभर वर्षें जूने सरबताचे दुकान.
कपिलाश्रम येधील शंभर वर्षें जूने सरबताचे दुकान.

सोलो ट्रॅव्हलर - शिल्पा परांडेकर
एखादे आपले प्रिय स्वप्न पूर्ण होताना पाहणे आणि त्यातही नव्या वर्षाची सुरवातच अशा स्वप्नपूर्तीने होत असेल तर मग तो दुग्धशर्कराच योग नाही का! नवी माणसे, नव्या जागा पाहणे, नवी संस्कृती समजून घेणे याचा जणू मला आता छंदच जडला आहे. या छंदामुळेच आपला संवाद घडत आहे. प्रवास, त्याविषयी गप्पा, गोष्टी, चर्चा, संवाद तर होतीलच आणि तूर्तास या प्रवासाची सुरुवात माझ्या पहिल्या प्रवासापासून.

सध्या सोलो ट्रॅव्हलर, सोलो ट्रिप्स या संकल्पना ७-८ वर्षांपूर्वी रुजायला सुरुवात होत होती. त्या वेळची ही माझी सोलो ट्रिप. लहानपणापासूनच बंगाली भाषा, संस्कृती, पेहराव, पदार्थ यांच्याविषयी एक आपुलकी, आपलेपणा वाटतो. त्यामुळे आपण कधीतरी कोलकात्याला जायचे, असा विचार मनामध्ये होता. अचानक तो क्षण आला.  
कामानिमित्त मला कोलकात्याला एकटीने जावे लागणार होते. काहींनी माझ्या एकटीने जाण्याच्या कल्पनेचे स्वागत केले, तर काहींनी सल्ल्यांचा भडिमार केला. मी तयारीला लागले.

मी आठवीत असताना मीना प्रभूंच ‘इजिप्तायन’ पुस्तक वाचले. विषय होता, एक विवाहित, मूलबाळ असलेली स्त्री एकट्याने भटकंती करते! ही कल्पनाच भारावून टाकणारी होती. जीपीएस, मोबाईल नाही. नकाशा, गाइड, ओळखीचे लोक आणि काही ठिकाणी नवीन ओळखी. या साऱ्यांच्या मदतीने, परिपूर्ण अभ्यास करून काही महिन्यांसाठी एखाद्या देशाची सफर करणे, किती अद्‍भुत कल्पना होती ती!

बस! ठरले. किशोरवयात मिळालेली ही प्रेरणा आजतागायत कायम आहे. तर कोलकात्याचेही मी असेच केले. शहराची सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक माहिती घेतली. प्रवास कसा करायचा, काय पाहायचे, काय खायचे. याची यादी बनवली.
बंगाली मिठायांची दुकाने, संग्रहालय, विवेकानंदांचे घर, मंदिरे पाहिली. ट्रामने प्रवास करण्याची मजा अनुभवली. दोन दिवसांत खूप फिरले, जितके पाहता येईल तितके पाहिले.

मी कुठल्यातरी अनोळखी शहरात एकटीच फिरत आहे, असे मला क्षणभरही वाटले नाही. उत्तम नियोजन, प्रवासाची आवड यामुळे प्रवास सुकर आणि संस्मरणीय तर होतोच, पण आपण ज्या ठिकाणी प्रवास करतो तिथले लोक, त्यांची संस्कृती यामुळेही प्रवास संस्मरणीय होतो. जसा माझा हा पहिला संस्मरणीय प्रवास ठरला.

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com