सोलो ट्रॅव्हलर : स्वतःचा स्वतःशी संवाद

शिल्पा परांडेकर
Friday, 24 January 2020

उदयपूर-जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, इंदूर-उज्जैन, खजुराह, हंपी, बदामी, पट्टडकल, कोकण, वेरूळ, उस्मानाबाद, खिद्रापूर अशा एक दिवस ते काही दिवसांच्या अनेक ट्रीप तिने केल्या आहेत. परंतु ‘पहिली सोलो ट्रीप’ केवळ संस्मरणीयच नसते, तर ती अनुभवविश्व समृद्ध करणारीही असते. नीलिमाचेही असेच काही झाले.

मी - हॅलो, नीलिमा देशपांडे बोलत आहेत का? मला तुमचा संदर्भ एक्सकडून मिळाला. तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असल्याचे समजले. त्याविषयी...

ती - हो, बरोबर. पण ट्रॅव्हलिंग माझी फक्त आवड नाही, तर पॅशन आहे.
या तिच्या एका वाक्याने मी कुठेतरी आतून तिच्याशी कनेक्ट झाले. मग प्रवास सुरू झाला तिचा ‘प्रवास’ जाणून घेण्याचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदयपूर-जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, इंदूर-उज्जैन, खजुराह, हंपी, बदामी, पट्टडकल, कोकण, वेरूळ, उस्मानाबाद, खिद्रापूर अशा एक दिवस ते काही दिवसांच्या अनेक ट्रीप तिने केल्या आहेत. परंतु ‘पहिली सोलो ट्रीप’ केवळ संस्मरणीयच नसते, तर ती अनुभवविश्व समृद्ध करणारीही असते. नीलिमाचेही असेच काही झाले.

तिचा यूपीएसीचा प्रयत्न नुकताच असफल ठरला होता. त्यामुळे आलेला रिकामपणा दूर करण्यासाठी कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जायचे तिने ठरवले. पहिल्या ‘अनियोजित’ सोलो ट्रीपचे - कुर्गचे नियोजन झाले. ट्रीप अनियोजित असली तरी नियोजन, खर्च, वगैरे गोष्टींचे बाळकडू तिला लहानपणापासूनच घरातून मिळाले असल्यामुळे प्रवासाचा आनंद मनमुराद घेता आला. ‘कुर्गच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात मी आणि माझ्यासोबत फक्त ‘मी’ होते,’ असे नीलिमा सांगते. तिच्या मते सोलो ट्रीपच्या माध्यमातून स्वतःला स्वतःशी उत्तमप्रकारे संवाद साधता येतो. ‘‘सोलो ट्रीप  माझ्यासाठी अमृता प्रीतम यांनी सांगितलेल्या ‘चौथा कमरा’ या संकल्पनेप्रमाणे आहे. अर्थात, स्वतःचं मन मोकळं करण्याची जागा. माझा आनंद फक्त प्रवासात नाही. प्रवासात वाचली जाणारी पुस्तकं आपल्याला वेगळा दृष्टिकोन देतात. प्रवासात भेटणारी माणसे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि प्रवासातले खाद्यसंस्कार हे तर एक भन्नाट प्रकरण असते! विविध देशातील, प्रांतातील पदार्थांबरोबरच कधीकधी सहप्रवाशाच्या डब्यातल्या पदार्थांचीही चव चाखता येते...’’ नीलिमा सांगत होती.

नीलिमाचा पहिला प्रवास मनःशांती आणि करिअरला योग्य दिशा देणारा ठरला. या ट्रीपनंतर तिने प्रवास, शिक्षण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा सुरेख मेळ साधत ‘रमा एज्यु-कल्चरल टुरिझम’ ही स्वतःची कंपनी सुरू केली.

सोलो ट्रीप आणि बजेट हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. नीलिमाने यावर तिचे एक खास गुपित आपल्याला सांगितले. सोलो ट्रीपसाठी तिचे बॅकेत एक स्वतंत्र खाते आहे.

विशिष्ट रक्कम साठली की, सोलो ट्रीपचे नियोजन होते. तसेच एकटीने फिरत असताना अनोळखी ठिकाणी कोणाशीही अतिमैत्री किंवा विनाकारण वाद टाळावेत, असे तिने आवर्जून सुचवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on nilima deshpande