esakal | ऑन डिफरंट ट्रॅक : मेरी आवाज हि पहचान है...
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka-Joshi

‘मेरी आवाज़ ही, पहचान है...’ लता दिदींच्या या सुरेल ओळी आपल्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकासाठीही अगदी समर्पक आहेत. जाहिराती, निवेदन, कॉर्पोरेट ब्रँडिंग, चित्रपट डबिंग, माहितीपट व ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांत ती कार्यरत आहे. ऑडिओ बुकचा ट्रेंड सध्या रुळत आहे.

ऑन डिफरंट ट्रॅक : मेरी आवाज हि पहचान है...

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

नाव - प्रियांका जोशी 
गाव - पुणे 
वय - ३५ वर्षे  
व्यवसाय - व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट, ट्रान्सलेटर 

‘मेरी आवाज़ ही, पहचान है...’ लता दिदींच्या या सुरेल ओळी आपल्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रियांकासाठीही अगदी समर्पक आहेत. जाहिराती, निवेदन, कॉर्पोरेट ब्रँडिंग, चित्रपट डबिंग, माहितीपट व ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांत ती कार्यरत आहे. ऑडिओ बुकचा ट्रेंड सध्या रुळत आहे. लेखकाने पुस्तकात मांडलेले विचार व भावना तितक्याच ताकदीने ऐकविण्याचे काम म्हणजे जणू शिवधनुष्य पेलण्यासाराखेच आहे. प्रियांका हे शिवधनुष्य उत्तम पेलत आहे, हे तिचे ऑडिओ बुकस् ऐकताना नक्कीच जाणवते. या क्षेत्रात येण्यापर्यंतचा तिचा प्रवास थोडा वेगळ्या वळणाचा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘मी आयटी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत होते. दरम्यान काही वर्षांपूर्वी कामानिमित्त चीनमधील शांघाय इथे वास्तव्यास असताना तेथील मराठी मंडळातर्फे सादर होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत मी सहभागी होत असे. या कार्यक्रमांना माझे निवेदन असायचे. माझ्या निवेदनाला प्रेक्षकांमधून उत्तम दाद मिळायची,’ असे प्रियांका सांगते. प्रियांकाला शाळेत असल्यापासूनच नाटक, एकांकिका यांची आवड होती. करिअर घडवताना छंद कुठेतरी मागे पडले, मात्र एका अनपेक्षित प्रसंगाने आपण आपल्या छंदांना प्रोत्साहन देऊ शकतो व यातच करिअरदेखील घडवू शकतो, याची जाणीव झाली. ‘‘नाट्यक्षेत्राची आवड असणाऱ्या आम्ही सर्वांनी मिळून शांघायमध्ये ‘शांघाई रंगमंचा’ची स्थापना केली. याद्वारे विविध नाटके, एकांकिका आम्ही सादर करत असू. याच दरम्यान ‘एनएसडी’चे अध्यक्ष वामन केंद्रे यांना भेटण्याचा योग आला. त्यांनी दिलेल्या सल्ला व मार्गदर्शनामुळे मी माझी रुळलेली वाट सोडून या नव्या वाटेवर प्रवास करण्याचे ठरविले,’’ असे ती सांगते. 

प्रियांकाने भारतात परतल्यावर या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केला. ती सांगते, ‘एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर लगेच काम मिळेल असे होत नाही. तुम्हाला कामाच्या संधी शोधाव्या लागतात.’ तिच्या या म्हणण्याप्रमाणे तिने लग्नाचे किंवा घरगुती समारंभाचे ‘ध्वनिमुद्रित आमंत्रण’ अशी भन्नाट कल्पना शोधली व ती ‘सुपरहिट’ही झाली. 

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व ‘चिल ब्रो’ या यू-ट्यूब चॅनेलने तिच्या या अनोख्या कामाची दखल घेऊन तिला सन्मानित केले आहे. प्रियांकाला या व नाट्य क्षेत्रात अजूनही बरीच मोठी कामगिरी करायची आहे आणि हे ती नक्की साध्य करेल. कारण, ‘अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.’ 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top