esakal | Video : सोलो ट्रॅव्हलर : अनुभूती...जगाशी जोडल्याची!
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa-Parandekar

मी १४ वर्षांची असताना पहिली ‘सोलो ट्रीप’ केली. तेव्हापासून नवीन गोष्टी, नवीन जागा आणि तिथल्या विविध गोष्टी, तिथला अमूल्य वारसा अनुभवण्याचा छंद मला लागला. सोलो ट्रॅव्हलर, गिर्यारोहक, लेखिका असलेली २२ वर्षीय ऋचा भिडे तिच्या प्रवासाविषयी सांगत होती.

Video : सोलो ट्रॅव्हलर : अनुभूती...जगाशी जोडल्याची!

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

मी १४ वर्षांची असताना पहिली ‘सोलो ट्रीप’ केली. तेव्हापासून नवीन गोष्टी, नवीन जागा आणि तिथल्या विविध गोष्टी, तिथला अमूल्य वारसा अनुभवण्याचा छंद मला लागला. सोलो ट्रॅव्हलर, गिर्यारोहक, लेखिका असलेली २२ वर्षीय ऋचा भिडे तिच्या प्रवासाविषयी सांगत होती.

ऋचाची पहिली सोलो ट्रीप – ‘हुबळी’. खरेतर सोलो ट्रीपवर जायचे, असा काही विचार नव्हता. लहानपणापासून वेगवगळ्या गोष्टींचा अनुभव घेणे, विविध संस्कृतीतील लोकांना भेटणे, त्यांची संस्कृती जाणून घेणे याची आवड तिच्या नकळत तिच्यात रुजत होती. हुबळीला जाण्याच्या संधीला तिच्या पालकांनी तिला सहमती दिली. तिथे ऋचा स्थानिक लोकांमध्ये राहिली, स्थानिक खाद्यसंस्कृती, स्थानिक संगीत व कलेचा रसास्वाद घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऋचा तिच्या या छंदाचे सर्व श्रेय तिच्या पालकांना देते. तिच्या या आवडीला व अंगभूत गुणांना तिच्या पालकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. वडिलांच्या प्रेरणेमुळेच ऋचाने सर्वप्रथम ‘हिमालयीन ट्रेक’ केला. ‘‘मी सर्वप्रथम ‘हिमालय’ पाहिला तेव्हा मला खूप भीती वाटली. वाटले, घरी निघून जावे. परंतु एका बाजूला भीती आणि दुसऱ्या बाजूला मनःशांतीदेखील मी अनुभवत होते. तेव्हा वाटले हेचं माझे ‘Ikigai’(जपानी शब्द) अर्थात, ‘माझ्या जीवनाचे ध्येय’. या ट्रेक्समुळे मी माझ्या नकळत एका विशिष्ट सुरक्षित कवचातून बाहेर पडले. जीवनातील विविध आव्हाने स्वीकारण्याची आणि पेलण्याची जिद्द निर्माण झाली. बरोबर की चूक याच्यापलीकडे जाऊन गोष्टी पाहण्याची सवय लागली.’’ ऋचाचा प्रवास प्रेरणादायी तर होताच, मात्र अजून पुढे काय हे जाणून घेण्याची उत्कंठता वाढत होती.

नंतर ऋचाने अरुणाचल प्रदेशमध्ये ‘Basic Mountaineering’चा कोर्स केला. २८ दिवसांच्या या कोर्सने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम झाल्याचे ऋचा सांगते. कसोल ते मानली, कलगा, पुलगा ते ग्रहण हे ट्रेक्स केले. मॅक्लोडगंज किंवा ढासा सर्वाधिक तिबेटीयन लोकसंख्या असणारे हिमाचल प्रदेशातील एक ठिकाण. या ठिकाणी ऋचाने प्रतिनिधी-प्रशिक्षक म्हणूनही तिबेटीयन निर्वासितांकरिता काम केले. हा अनुभव तिला थेट ‘हंपी’ला घेऊन आला. येथेही प्रातिनिधिक स्वरुपात ‘टूर ऑर्गनायझेशन’चे काम करण्याचा अनुभव मिळाला.

ऋचाच्या मते, एकट्याने, मुक्तपणे प्रवास करण्यासारखी दुसरी कोणती सुंदर गोष्ट नाही. मी एकटी प्रवास करत असते तेव्हा मी माझ्या स्वतःसोबत असते. प्रवासात मला स्वतःला विश्वाशी जोडल्याची अनुभूती मिळते. हा प्रवास खूप काही शिकवतो, जे केवळ पुस्तके वाचून किंवा वर्गांत शिकून मिळत नाही.

loading image