esakal | मेमॉयर्स : माझ्यासाठी आई सर्वकाही...
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री शिवानी बावकर आपल्या आईसमवेत.

आई, आईबद्दल काय बोलावे. कधी-कधी ती माझी मैत्रीण असते, कधी-कधी माझी शिक्षिका, तर कधी-कधी माझी क्रिटिक आणि नेहमीच माझी सपोर्ट सिस्टिम. आईने मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं. एका मुलीला मोठं होताना जे काही माहीत असायला हवं, ते माझ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती नेहमीच मला सांगत गेली. तेव्हा एखाद्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याची पूर्वकल्पना मला असायची. मी आणि माझी धाकटी बहीण एकमेकींच्या खूप जवळ आहोतच, पण त्याहीपेक्षा जवळ आम्ही आईच्या आहोत.

मेमॉयर्स : माझ्यासाठी आई सर्वकाही...

sakal_logo
By
शिवानी बावकर, अभिनेत्री

आई, आईबद्दल काय बोलावे. कधी-कधी ती माझी मैत्रीण असते, कधी-कधी माझी शिक्षिका, तर कधी-कधी माझी क्रिटिक आणि नेहमीच माझी सपोर्ट सिस्टिम. आईने मला नेहमीच चांगलं मार्गदर्शन केलं. एका मुलीला मोठं होताना जे काही माहीत असायला हवं, ते माझ्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती नेहमीच मला सांगत गेली. तेव्हा एखाद्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं याची पूर्वकल्पना मला असायची. मी आणि माझी धाकटी बहीण एकमेकींच्या खूप जवळ आहोतच, पण त्याहीपेक्षा जवळ आम्ही आईच्या आहोत. खूप वाचन असल्यामुळं तिला ज्ञानही खूप आहे, म्हणून तिच्यापाशी एखादा प्रॉब्लेम घेऊन गेल्यावर त्यावर सोल्युशनही ती देणारच, ही खात्री असते. आणि माझ्या बाबतीत फक्त एवढंच नव्हे, तर ॲक्‍टिंग टिप्सही तिच्याकडून मिळतात. कारण, ती स्वतः तिच्या कॉलेजच्या काळात थिएटर आणि संस्कृत बॅले करायची. 

आम्हाला तिनं जरुरीपुरता स्वयंपाक करायला केव्हाच शिकवला आहे, त्यामुळं आम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. माझी आई माझ्यासाठी एक कंप्लिट पॅकेज आहे. तिला माझ्या सगळ्या गोष्टी, माझ्या सगळ्या फिलिंग्ज माहीत असतात. आई आपल्या कुटुंबाला बांधून ठेवते. आमचा फॅमिली बॉण्ड इतका घट्ट असल्यामुळं मी कधीही पिअर प्रेशरच्या जाळ्यात अडकले नाही. न पटणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायची ताकद तिनं आम्हाला दिली. 

‘लागिर झालं जी’ ही मालिका मला मिळाल्यावर मला तिने खूप मदत केली. अगदी गावात कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहायचं हे तिनंच मला सांगितलं. कलाकारांमधील मी एकटीच मुंबईची होते. त्यामुळं मला तिथं ॲडजेस्ट करावं लागंल हे तिला माहीत होतं, पण तिनं केलेल्या मार्गदर्शनामुळं मी तिथल्या मातीतली असल्यासारखी वावरू शकले. ती माझ्यापासून लांब असूनही कधीच लांब नव्हती, कारण तिनं सांगितलेल्या गोष्टींशी मला रोज सामोरं जावं लागायचं आणि तिनं सांगितल्यानुसार केलं किंवा वागलं, की सगळ्या परिस्थितीवर मात करता यायची; कारण तशी तालीम तिनं मला आधीच दिलेली असायची. 
असे प्रसंग सांगायचे झाल्यास खूप आहेत; पण एक गोष्ट मी सारखी म्हणेन, की आईच्या स्वरूपात एक कंप्लिट पॅकेज मिळालं हे माझं भाग्य आहे. अशी माझी आई! 

loading image