ॲप + : स्किल थोडं वाढवूया...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

काय शिकता येईल..? 

  • एकूण २४ प्रकारची छोटी-मोठी स्किल्स. 
  • लिहायचं कसं, नाच कसा शिकायचा? 
  • कागदापासून छान डिझाइन्स कशी करायची? 
  • सगळ्या कोर्सेसचे व्हिडिओ. 

क्रोशे डिझाइन आवडतं...? क्रोशे डिझाइन म्हणजे सगळा हाताचा कारभार. एक टाका असा आणि दुसरा तसा... 

कधीतरी वाटतं की, आपल्यालाही पेंटिंग यायला पाहिजे होतं..! ब्रश, पेंट, समोरच्या कॅनव्हासवर उमटत जाणारं चित्र वगैरे... हे असं वाटणं आणि प्रत्यक्षात करणं, यातली गॅप मोबाईल ॲप मिटवू शकतात. एक-दोन क्‍लिक आणि काम सुरू...! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परवा शोधताना Bluprint ॲप सापडलं. ब्ल्यूचं स्पेलिंग वेगळं वाटलं, म्हणून डाऊनलोड केलं आणि हाती खजिनाच लागला. एखादी गोष्ट कुणाला छान करता येत असेल, तर आपण सहज म्हणून जातो, ‘काय स्किल आहे नाही...’ आपलंही स्किल वाढवणारं हे ॲप आहे. अशी आणखीही ॲप्स आहेतच; सुरुवात Bluprint नं करून पाहूया. ॲपची भाषा इंग्रजी; मात्र व्हिडिओ उत्तम दर्जाचे आहेत. व्हिडिओ पाहूनही समजू शकतं, की क्रोशेसाठी धागा आडवा घ्यायचा की उभा! मोबाईलमुळं फोटोग्राफी सोप्पी झाली आहे. फोटो एडिटिंग नावाचं प्रकरण नीट समजलं, तर काढलेला फोटो सुंदर खुलवता येतो. त्याचं स्किलही ॲपवर पाहता येतं. Bluprint ॲप अमेरिकन मीडिया ग्रुपचा भाग. ॲपकडं तज्ज्ञांची टीम आहे. ती टीम व्हिडिओ बनवते. म्हणून त्यांना दर्जा राखता येतो. 

तुम्ही वापरता का असं ॲप? ते मेड इन इंडिया असेल, तर आम्हाला जरूर पाठवा 
maitrin@esakal.com वर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on skill