esakal | फॅशन + : स्कर्टचा 'समर लुक'
sakal

बोलून बातमी शोधा

Skirt

उन्हाळ्यात फॅशनमध्ये सुटसुटीत आणि हलके पर्याय निवडायला सर्वांनाच आवडतात. स्कर्ट हा सर्वच महिलांच्या आवडीचा विषय आहे. उन्हाळ्यात स्कर्ट तुम्हाला सुटसुटीत वाटेलच, शिवाय तो तुम्हाला कम्फर्टेबल फीलही देईल. तसे पाहायला गेल्यास स्कर्टचा कोणताही पर्याय आउटडेटेड कधीच होत नाही. चोळी फॅशनचे स्कर्ट अजूनसुद्धा इन आहेत.

फॅशन + : स्कर्टचा 'समर लुक'

sakal_logo
By
सुवर्णा येनपुरे-कामठे

उन्हाळ्यात फॅशनमध्ये सुटसुटीत आणि हलके पर्याय निवडायला सर्वांनाच आवडतात. स्कर्ट हा सर्वच महिलांच्या आवडीचा विषय आहे. उन्हाळ्यात स्कर्ट तुम्हाला सुटसुटीत वाटेलच, शिवाय तो तुम्हाला कम्फर्टेबल फीलही देईल. तसे पाहायला गेल्यास स्कर्टचा कोणताही पर्याय आउटडेटेड कधीच होत नाही. चोळी फॅशनचे स्कर्ट अजूनसुद्धा इन आहेत. पारंपरिक पोशाखात चोळी फॅशनच्या स्कर्ट टॉपला प्राधान्य दिले जाते. आज आपण उन्हाळ्यात घालता येणारे विविध प्रकारचे स्कर्ट पाहणार आहोत.

फ्लेयर्ड स्कर्ट -
प्रिटेंड फ्लेयर्ड स्कर्ट प्लेन शर्ट किंवा टी शर्टवर आकर्षक दिसतात.

स्टेटमेंट स्कर्ट -
स्टेटमेंट स्कर्ट उन्हाळ्यात जास्त लोकप्रिय होतात. स्कर्टमध्ये इतरांपेक्षा वेगळा आणि हटके पर्यायाच्या शोधात तुम्ही असल्यास स्टेटमेंट स्कर्टचा विचार तुम्ही करू शकता.