फॅशन + : उन्हाळ्यासाठी सुटसुटीत जंपसूट

सुवर्णा येनपुरे-कामठे
Sunday, 5 April 2020

  • बहुतांश जंपसूट्स फुल गळ्याचे असल्याने गळ्यात कोणतीही ज्वेलरी घालण्याची गरज पडत नाही.
  • कानात साजेसे छानसे दागिने घालावेत. एका हातात उठून दिसेल असे मॅचिंग कडे किंवा ब्रेसलेट घालावे.
  • पायात स्नीकर्स किंवा हाय हिल्स घालाव्यात.
  • लांब पट्ट्यांची हॅण्डबॅग घ्यावी. हॅण्डबॅगची सवय नसल्यास नेहमीच्या साईजपेक्षा जरा छोटी प्रिंटेड सॅक खांद्याला लावावी.
  • उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी हॅट घातल्यासही आकर्षक वाटते.

उन्हाळा आपल्याला जास्तीत जास्त ट्रेंडी राहण्याची संधी देत असतो. वनपीस, टू पीस, थ्री पीस, फ्रॉक, जीन्स, लूज टी-शर्ट/शर्टस्, क्रॉप टॉप असे अनेक प्रकार आपण उन्हाळ्यात सहज परिधान करू शकतो. फक्त काही नियम उन्हाळ्यात पाळायची गरज असते, ते म्हणजे कपडे जास्त घट्ट नको; त्यामुळे घाम येणे, खाज येणे असे प्रकार घडतात.

त्याचबरोबर जास्त गडद रंगाचे कपडे या सीझनमध्ये घालू नयेत. गडद रंगांच्या कपड्यांमुळे जास्त गरम होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात अधिकाधिक ट्रेंडी राहण्यासाठीचा आपण असाच एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे जंपसूटचा! जंपसूट्स सुटसुटीत असल्याने उन्हाळ्यात सुसह्य असतात आणि कॅरी करायलाही अगदी सोपे असतात. हाफ पॅन्टपासून ते फूल पॅन्टपर्यंत विविध प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. ऑफ शोल्डरचेही काही प्रकार यामध्ये पाहायला मिळतील.

  • बहुतांश जंपसूट्स फुल गळ्याचे असल्याने गळ्यात कोणतीही ज्वेलरी घालण्याची गरज पडत नाही.
  • कानात साजेसे छानसे दागिने घालावेत. एका हातात उठून दिसेल असे मॅचिंग कडे किंवा ब्रेसलेट घालावे.
  • पायात स्नीकर्स किंवा हाय हिल्स घालाव्यात.
  • लांब पट्ट्यांची हॅण्डबॅग घ्यावी. हॅण्डबॅगची सवय नसल्यास नेहमीच्या साईजपेक्षा जरा छोटी प्रिंटेड सॅक खांद्याला लावावी.
  • उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी हॅट घातल्यासही आकर्षक वाटते.

जंपसूटची किंमत ३०० ते ४०० रुपयांपासून असल्याने एक-दोन सेट तुम्ही नक्कीच तुमच्या वॉर्डरोबमध्ये ॲड करू शकता. प्रिंटेड जंपसूट्सदेखील सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article suvarna yenpure on jumbsuit

Tags
टॉपिकस
Topic Tags: