ट्रेडिंग + : ट्रेंड 'सेल्फ पोर्ट्रेट'चा

Rajavi-Gandhi
Rajavi-Gandhi

सोशल मीडियावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ‘फोटो’. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट अशा काही अनेक प्रमुख ट्रेंडिग अॅप्सवर नेटकरी आपले फोटो शेअर करत असतात. बाहेर फिरण्याचे, एखाद्या ठिकाणी किंवा स्वतःचे फोटो सर्वच जण शेअर करतात. मात्र, आता लॉकडाउनमुळे तुम्ही आम्ही घरी आहोत. स्वत:चे फोटो काढायला फोटोग्राफर किंवा मित्र-मैत्रीणी जवळ नसताना कशाप्रकारे फोटो काढायचे यावरचा उपाय नेटकऱ्यांनीच शोधला आहे. लॉकडाऊनमध्येही सोशल मीडियावर अनेक गोष्टींचा ट्रेंड येतोय. त्यामधील एक म्हणजे ‘सेल्फ पोट्रेट’. अर्थात, घरच्या घरी तुम्ही स्वत:चे फोटो काढू शकता. जाणून घ्या सेल्फ पोट्रेटमध्ये कोणते प्रकार सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.

ओढणी, साडी, स्कार्फचा वापर
प्रत्येक घरामध्ये अगदी सहजरित्या आणि हमखास सापडणारी गोष्ट म्हणजे ओढणी, स्कार्फ किंवा साडी. त्याच्या साहाय्याने फोटो काढण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ट्रायपॉडच्या मदतीने तुमचा कॅमेरा किंवा स्मार्टफोन एका जागी ठेवा. एका बाजूने कॅमेरावर आणि दुसऱ्या बाजूने डोक्यावरुन तुम्ही कोणतीही ओढणी घ्या. कॅमेरा आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये थोडेसे अंतर ठेवा. टायमर सेट करुन वेगवेगळ्या पोज देत फोटो क्लिक करा. चेहऱ्यावर नक्षीचे प्रतिबिंब पडेल शिवाय फोटोला एक प्रोफेशनल लुक मिळेल. तुमच्याकडे ट्रायपॉड नसल्यास स्मार्टफोनवर टायमर लावून फोटो क्लिक करा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्काय बॅकग्राऊंड
निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढणे कधीही चांगले. ते फोटो नेहमीच इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर असतात. फोटोसाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते बॅकग्राऊंड. त्यासाठी खुल्या आकाशाचा वापर केला तर? स्काय बॅकग्राऊंड या प्रकारामध्ये टेरेसवर किंवा मोकळे आकाश असणाऱ्या ठिकाणाहून तुम्हाला फोटो काढायचा असतो. जमिनीवर फोन किंवा कॅमेरा टायमर लावून सेट करा. जमिनीमधील आणि तुमच्यामधील अंतर योग्य ठेवण्यासाठी ट्रायपॉड किंवा घरातील काही गोष्टींचा वापर करुन त्यावर फोन ठेवा. फोनमध्ये तुम्हाला वाकून पाहून पोज द्यावी लागते. जेणेकरुन फोटो क्लिक झाल्यावर तुमच्या मागे सुंदर निळेशार आकाश दिसेल. संध्याकाळी हे फोटो काढल्यास चांगली बॅकग्राऊंड मिळेल.

जाळीचा वापर करा !
नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे फोटो असण्याची चढाओढ सोशल मीडियावर सतत सुरू असते. साधा फोटो किंवा सेल्फी याच्याही पुढे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नेटकरी करतात. घरामध्ये खिडक्यांना, दारांना किंवा कोणत्याही एखाद्या कॉर्नरमध्ये जाळी ही असतेच. सूर्याची किरणे घरामध्ये येत असताना या जाळीच्या साहाय्याने फोटो काढा. जाळीमधून पडणारी सावली तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि फोटोला एक अनोखा लुक मिळेल. घरामध्ये असणारी चाळणी किंवा कोणतेही जाळीदार गोष्टीचा वापर करुन अशा पद्धतीने फोटो काढता येतील. त्यामधून चेहऱ्यावर पडणारी सावली योग्य त्या अॅंगलने काढण्यावर भर द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com