esakal | ग्रुमिंग + : नेल आर्टचे प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Nail-Art

मागील भागात आपण सोप्या पद्धतीने नेल आर्ट कसे करता येईल याची माहिती आणि त्याविषयी टिप्स पाहिल्या. नेल आर्टमध्ये विविध प्रकार आहेत, त्याची आपण आज माहिती घेणार आहोत.

ग्रुमिंग + : नेल आर्टचे प्रकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मागील भागात आपण सोप्या पद्धतीने नेल आर्ट कसे करता येईल याची माहिती आणि त्याविषयी टिप्स पाहिल्या. नेल आर्टमध्ये विविध प्रकार आहेत, त्याची आपण आज माहिती घेणार आहोत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोल्का डॉट्स डिझाइन -
पोल्का डॉट्स हा कपड्यांचा प्रकार तुम्ही अनेकदा ऐकला आणि पाहिलादेखील असेल. कोणत्याही एका रंगावर दुसऱ्या रंगाचे मोठे ठिपके, म्हणजेच पोल्का डॉट्स. या प्रकारामध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या रंगांवर मोठे ठिपके देऊन तुम्ही हा प्रकार नेल आर्टमध्ये ट्राय करू शकता.

मल्टी कलर -
नखांसाठी एकच रंग निवडणे खरेच अवघड आहे. रोज परिधान करण्याचे कपडेही वेगळे असल्याने मॅचिंग नेलपेंट लावणे शक्य होत नाही. त्यासाठी नेल आर्टचा एक फंकी आणि अनोखा पॅर्टन म्हणजे मल्टीकलर. यामध्ये हाताच्या दहा बोटांच्या नखांना तुम्ही वेगवेगळे रंग लावता किंवा बोटांना आलटूनपालटूनही रंग बदलून लावू शकता. 

क्रोम नेल्स -
क्रोम नेल्समध्ये एखादा ग्लासी आणि ग्लॉसी लुक यामध्ये नखांना येतो. अर्थात या प्रकारच्या नेलपेंटचे रंग हे ग्लॉसी असतात. एखाद्या धातूप्रमाणे त्याला शाईन असते. पार्टीसाठी, कार्यक्रमासाठी अशाप्रकारचे नेल्स नक्कीच चांगला पर्याय आहे.

ओम्ब्रे नेल्स -
नखांना अखंड नेलपेंट लावायची फॅशन बदलत आहे. या प्रकारामध्ये नखांच्या टिप्सवर (सुरुवातीला) गडद रंग लावतात. तर, नखांच्या आतील भागाला अगदी लाइट रंग देतात. नखांना हा एक वेगळाच फिल देतात. 

शिमर -
पार्टीवेअरसाठी नखांचा हा प्रकार अतिशय उत्तम आहे. पार्टीवेअरशिवाय इतर दिवशीही हे नेलआर्ट उठून दिसते. या नखांसाठी जेल पॉलिशचा उपयोग करून त्यावर त्याच रंगाची शिमर किंवा ग्लिटर नेलपेंट वापरण्यात येते. तुम्ही लाइट ब्लू रंगाची नेलपेंट लावल्यास त्यावर गडद रंगाचे निळे शिमर नखांच्या पुढील भागांना लावा. 

कॉम्बिनेशन -
यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. या प्रकारामध्ये कोणताही एक रंग निवडा. त्याच्या लाइट आणि डार्क शेड नखांना लावा. पाचपैकी एका नखाला ग्लिटर नेलपेंट लावा. पाचही नखांना वेगळा पण, एकाच शेडमधील रंग असेल.

डबल कलर -
कोणतेही दोन रंग निवडा आणि ते एका नखावर लावा. आडवे, क्रॉस, उभे अशा कोणत्याही पॅर्टनमध्ये हे दोन रंग एकाचवेळी लावा.