पालकत्व निभावताना... : आपली ॲसेट जपूयात...

आशिष तागडे
Saturday, 26 December 2020

‘पालकत्व निभावताना’ या सदरात अनेक विषयांना आपण स्पर्श केले. खरंतर मूल ही आपली जबाबदारी आहे की कर्तव्य याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. मुळात आपण कोणत्या पद्धतीने या विषयाकडे पाहतो, याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. पालकत्व ही खूप चांगली भूमिका आहे. परिस्थिती आणि विषयानुसार त्यामध्ये आपल्याला समरस होता आले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाल्यावर आपण निर्णय लादतो असे वाटता नये.

‘पालकत्व निभावताना’ या सदरात अनेक विषयांना आपण स्पर्श केले. खरंतर मूल ही आपली जबाबदारी आहे की कर्तव्य याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. मुळात आपण कोणत्या पद्धतीने या विषयाकडे पाहतो, याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. पालकत्व ही खूप चांगली भूमिका आहे. परिस्थिती आणि विषयानुसार त्यामध्ये आपल्याला समरस होता आले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाल्यावर आपण निर्णय लादतो असे वाटता नये.

खूप शिस्त लावणे किंवा खूप धाकात ठेवणे म्हणजे चांगले पालकत्व नव्हे. काही प्रमाणात शिस्त चांगली असली तरी त्याचे दडपण असू नये. पालकांची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे ऐकवण्यापेक्षा ऐकण्याची तयारी असणे खूप आवश्यकच आहे. परिस्थितीनुसार आपण बदलणे म्हणजे काहीतरी चूक आहे किंवा कमी आहोत, अशी भावना असू नये. काही गोष्टींची तयारी ठेवल्यास आपल्याला पालकत्व निभावताना काहीच त्रास होत नाही. काही पथ्यं जरूर पाळणे आवश्यक वाटते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाल्याची कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याशी तुलना टाळली पाहिजे. कारण प्रत्येक मुलगा एकमेवाद्वितीय असतो. आपल्या मुलातही काही वेगळे आणि चांगले गुण असतात. ते हेरा. त्या गुणांना प्रोत्साहन द्या. ती देत असताना आपण खूप काही वेगळे करतो. असा अविर्भाव असता कामा नये. पाल्यालाही तसा फिल येऊ देऊ नये. त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन देताना न कळत आपल्याही कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते, याची जाणीव ठेवावी.
आपल्याला जे जमले नाही, ते आपल्या पाल्याने करावे, अशी अपेक्षा नक्कीच ठेवू नका. आपली स्वप्ने त्याच्यावर लादू नका.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

योग्य वयात योग्य पद्धतीने समजावून सांगता आले पाहिजे. पाल्याची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. त्याला काही समजून सांगताना आपणही तसे वागण्याचा प्रयत्न करावा. समजा मोबाईल फार वापरू नका, असे सांगत असताना आपणही कमीत कमी मोबाईल कसा वापरता येईल याची काळजी घेतली पाहिजे.

पाल्याला चांगल्या सवयी (आपल्या लेखी) लावायच्या असतील तर त्या आपल्यात आहेत का, याची काळजी निश्चितच घेतली पाहिजे. चांगल्या सवयी म्हणजे काय, याची खातरजमा केलीच पाहिजे. कारण आपल्या चांगल्या सवयी काळाच्या कसोटीवर कदाचित वेगळे ठरू शकतात. त्याचा विचार केलाच पाहिजे.

पालकत्व ही खरोखर खूप चांगल्या प्रकारे आनंद आणि समाधान घेण्याची बाब आहे. चांगले पालकत्व ही कोणत्या पुस्तकातून शिकण्याची गोष्ट नाही. ती त्या-त्या परिस्थितीनुसार काहीतरी नवीन शिकविणारी गोष्ट असते. त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. पालकत्व ही जशी जबाबदारी आहे, त्यापेक्षा ॲसेट म्हणून अनुभवण्याची आणि निभावण्याची कला आहे. ती जपूयात....सर्व पालकांना नवीन वर्षात पालकत्वाच्या अनुभूतीसाठी शुभेच्छा....

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Aashish Tagade on maintaining guardianship