मेकअप ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. हेअर कलरिंगपासून आयलायनरपर्यंत आणि फाउंडेशनपासून नखांची काळजी कशी घ्यायची इथपर्यंत कानमंत्र देणारं हे सदर.
- मेकअप चढवताना थंड गुलाबपाण्याने चेहरा पुसून घ्यावा, त्यामुळे चेहऱ्याचे पोअर्स बंद होऊन मेकअपचा कोणताच थर स्किनमध्ये जात नाही.
- मेकअप उतरवताना क्लिन्झिंग मिल्कनं साफ करावा आणि झोपण्यापूर्वी तेलानं हलका मसाज करावा. त्यामुळे चेहरा ड्राय होत नाही.
- मेकअप किट घेताना त्याची एक्सपायरी डेट न विसरता पाहून घ्यावी आणि चांगले ब्रँड निवडावेत. मेकअपचे ब्रश उन्हात ठेवावेत.
- केसांचा कंगवा आठवड्यातून दोन वेळा तरी गरम पाण्याने धुवावा.
- लिपस्टिकची शेड निवडताना आपल्या ओठांच्या मूळ रंगांचाही विचार करावा.
- हल्ली मॅट आणि न्यूड कलरचा ट्रेंड आहे. मेकअपच्या शेवटी मान, पाठ यावरही फाउंडेशनचा एक हात फिरवावा.
- फाउंडेशनचे स्पाँज नेहमी स्वच्छ धुऊन वापरावेत.
- केसांना हेअर कलर, नेल आर्ट या गोष्टींमुळे अजून प्रोफेशनल लुक येतो.
- क्लीनअप, हेअरस्पा, मेनीक्युएर पेडीक्युएर केल्यास याही गोष्टी तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला खुलवण्यात उपयोगी पडतात.
- कार्यक्रमात मेकअपवर घाम येत असल्यावर टिश्यूनं हळूच टिपून घ्यावा.
Edited By - Prashant Patil
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:
Article Write on Care on Makeup