आईशी संवाद : चिडचिडेपणाचं करायचं काय? 

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Saturday, 5 December 2020

राग येणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. लहान मुलांमध्ये मात्र काही वेळा राग अनावर झाल्याने मूल त्रागा करते तेव्हा त्याला ‘टेम्पर टँट्रम’ म्हणतात.

अतिचिडचिडेपणातून होणाऱ्या गोष्टी
जोरात रडणे, वस्तू फेकणे, इतरांना/भावंडांना मारणे/श्वास रोखून धरणे/ओरडणे/लाथा मारणे/ डोके आदळून घेणे.

राग येणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. लहान मुलांमध्ये मात्र काही वेळा राग अनावर झाल्याने मूल त्रागा करते तेव्हा त्याला ‘टेम्पर टँट्रम’ म्हणतात.

अतिचिडचिडेपणातून होणाऱ्या गोष्टी
जोरात रडणे, वस्तू फेकणे, इतरांना/भावंडांना मारणे/श्वास रोखून धरणे/ओरडणे/लाथा मारणे/ डोके आदळून घेणे.

वय -
अतिचिडचिडेपणा एक ते तीन वर्षांत सुरू होतो. पाच वर्षांनंतर त्रागा केल्यास गोष्टी मिळत गेल्यास तो वाढू शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारणे व मानसिकता -

  • त्रागा करून/वस्तू फेकून आपला राग व्यक्त करणे ही लहान मुलांची एक पद्धत असू शकते. एक ते तीन वर्षांपर्यंत अजून भाषा विकसित झालेली नसते. तेव्हा मूल ही पद्धत वापरते. नंतर मूल बोलू लागल्यावर जेव्हा ते त्रागा करेल, तेव्हा त्याला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा नको आहे, हे भाषेचा वापर करून सांगण्यास शिकवावे लागते. गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेण्यास, हवी असलेली वस्तू मिळवण्यास व घरातील सदस्यांवर वर्चस्व गाजवण्यास मूल राग व्यक्त करताना अशी कृत्ये करते. जर अशा करण्याने त्याच्या इच्छा पूर्ण व्हायला लागला, तर ते असे वारंवार करते. 
  • यातून ही एक अंगवळणी पडलेली वर्तणूक होऊन जाते. 
  • पालक व घरातील इतर सदस्य कसे वागतात, याच्या निरीक्षणातूनही राग आल्यावर कसे व्यक्त व्हायचे, हे मूल शिकत असते. त्यामुळे लहान मुलांसमोर राग व्यक्त करताना पालकांनीही संयम व भान ठेवणे गरजेचे असते. 
  • काही वेळा अतिरागवणे हे मुलाची अधिक प्रेमाची व लक्ष देण्याची गरज दर्शविते. 

पालकांनी काय करावे?

  • मूल चिडले, की पालकांनीही त्याला चिडून त्याच आवेशाने उत्तर देणे चुकीचे असते. मूल रागावल्यावर त्याला शांत करणे, हे तुमचे काम असते, याचे भान ठेवावे. 
  • कुठल्या करणासाठी मुलाने घर डोक्यावर घेतले आहे, यावर कसा प्रतिसाद द्यायचा, हे ठरते. मुलाची एखादी मागणी अव्यवहारी व शिस्तीत न बसणारी असेल, तर या चिडचिडीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. ठरवून दिलेल्या नियमावर शांतपणे ठाम राहावे. मात्र, दुर्लक्ष करताना मुलाला इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. 
  • त्रागा करण्याचे कारण भावनिक असेल, तर मुलाला जवळ घेऊन शांत करणे गरजेचे असते. 
  • ज्या गोष्टीसाठी हट्ट सुरू आहे, ती गोष्ट का शक्य नाही, याचे स्पष्टीकरण मुलाला देत बसू नका. इतर गोष्टींकडे मन वळविण्याचा प्रयत्न करा. 
  • एखादी गोष्ट करायला सांगितल्यावर त्रागा केला असल्यास, काही वेळ थांबून मूल शांत झाल्यावर सांगितलेला टास्क झाला की नाही, याचा मागोवा घ्यावा. 
  • मूल स्वतःला इजा करत नसेल, तर त्याला शांत होण्याचे प्रेमाने समजावून सांगून त्याला थोडा वेळ एकट सोडण्यास हरकत नाही. फक्त दार उघडे ठेवून मुलाकडे लक्ष ठेवावे. तो आपोआप शांत झाल्यास त्यालाही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे कळेल.

तसे पाहायला गेल्यास चिडचिडेपणा हा लहान मुलांच्या विकासातील टप्प्यांचा नॉर्मल भाग असतो; पण त्याचे प्रमाण वाढले, त्याने मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल, शारीरिक इजा होत असेल व अतिराग येऊन त्रागा करण्याचे प्रमाण वाढत असेल, तर त्याची नोंद घ्यावी लागते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Amol Annadate on Irritability

Tags
टॉपिकस
Topic Tags: