नो युअर डाएट : वजन घटविण्यासाठीचे ‘अटकिन्स’

मृणाल तुळपुळे
Monday, 7 December 2020

डॉ. रॉबर्ट अटकिन्स या प्रथितयश अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञाचे ‘डॉ. अटकिन्स डाएट रिव्हॉल्युशन’ हे पुस्तक १९७२मध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हापासून या पुस्तकातील वजन कमी करण्यासाठीची आहारपद्धती ‘अटकिन्स डाएट’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

डॉ. रॉबर्ट अटकिन्स या प्रथितयश अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञाचे ‘डॉ. अटकिन्स डाएट रिव्हॉल्युशन’ हे पुस्तक १९७२मध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हापासून या पुस्तकातील वजन कमी करण्यासाठीची आहारपद्धती ‘अटकिन्स डाएट’ या नावाने ओळखली जाऊ लागली.

अटकिन्स डाएट म्हणजे हाय प्रोटिन्स, मॉडरेट फॅट्स आणि लो कार्बोहायड्रेट्स असलेले डाएट. कार्बोहायड्रेट्स हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारातील त्यांचे प्रमाण कमी करणे आवश्‍यक असते. कार्बोहायड्रेट्स खाणे कमी केल्सास ऊर्जा देण्यासाठी शरीरात साठलेल्या फॅट्सचा उपयोग केला जातो. त्यामुळे वजन कमी होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. अटकिन्स यांनी या डाएटची चार टप्प्यांत विभागणी केली आहे. 
१) इंडक्शन फेज - हा टप्पा दोन आठवड्यांचा असून, त्यात प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबर दिवसाला फक्त २० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स खाण्याची परवानगी असते. या टप्प्यात वजन अतिशय जलद गतीने कमी होते. 

२) बॅलन्सिंग फेज - या टप्प्यातील आहारात थोडे नट्स, एखादे फळ व पिष्टमय घटक नसलेल्या भाज्यांचा समावेश केला जातो. या टप्प्यात पहिल्या टप्प्यापेक्षा थोडे कमी वेगाने वजन कमी होते. 

३) फाइन ट्युनिंग - हा टप्पा सुरू झाल्यावर वजन कमी करण्याचे उद्दिष्ट अगदी जवळ आलेले असते. यात वजन हळूहळू कमी होऊन ठेवलेले उद्दिष्ट गाठले जाते. 

४) मेन्टेनन्स - या टप्प्यात आहारातील आरोग्यदायी कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवून कमी झालेले वजन टिकवून ठेवले जाते.

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अटकिन्स डाएट करताना चिकन, चीज, अंडी हे प्रथिने असलेले पदार्थ भरपूर प्रमाणात व तेल, तूप, लोणी, क्रीम असे स्निग्ध पदार्थ मध्यम प्रमाणात खायचे असतात. मात्र, आहारातून ब्रेड, पास्ता, भात, पोळी असे कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ वर्ज्य करावे लागतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अटकिन्स’ची वैशिष्ट्ये 

  • कमी कार्बोहायड्रेट्स असलेला वजन कमी करण्यासाठीचा एक प्रभावी आहार. 
  • इतर डाएटच्या तुलनेत वजन वेगाने घटते. 
  • रक्तातील ट्रायग्लिसराइड्स व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत उपयोगी. 
  • मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी खूप फायदा होतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Mrunal Tulpule on Atkins for weight loss

Tags
टॉपिकस
Topic Tags: