सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाचं पेज किंवा प्रोफाइल उघडल्यानंतर त्याला पुरेसे फॉलोअर्स मिळवणं, ही अत्यंत महत्त्वाची पायरी असते, हे आपण गेल्या भागात बघितलं. असे फॉलोअर्स मिळविण्यासाठी आपण आपल्या प्रोफाइलवर किंवा पेजवर नेमकं काय प्रकाशित करतो, हे महत्त्वाचं असतं. आपल्या व्यवसायाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा कन्टेंट नेमका काय असावा आणि तो कसा पोस्ट करावा, याविषयी या भागात चर्चा करूया.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नियमित पोस्ट हव्यात
मार्क झुकेरबर्ग यांच्याकडं ‘फेसबुक’प्रमाणेच ‘व्हॉट्सॲप’चीही मालकी आहे. या आणि अशा सोशल मीडियावर आपण प्रोफाईल सुरू केल्यानंतर पहिल्या चार-पाच पोस्ट काय असाव्यात, हे आधीच तयार करून ठेवून त्या पहिल्या आठवडाभरात पोस्ट कराव्यात. त्यापुढेही, आपण तयार केलेली सर्व माहिती एकाच वेळी एकाच दमात पोस्ट करू नये, तर ती टप्प्याटप्प्यानं काही दिवसांच्या अंतरानं पोस्ट करत जावी. खरं तर आपण पुढचा महिनाभर किंवा दोन-तीन महिनेही काय पोस्ट करणार आहोत, याचं नियोजन करून त्या पद्धतीनं आपला कन्टेंट तयार करून ठेवावा आणि तो टप्प्याटप्प्यानं पोस्ट करत जावा. कारण, एकदम एकाच वेळी आलेल्या भरपूर पोस्ट्सपेक्षा नियमितपणे येत राहणाऱ्या पोस्ट्सना जास्त प्रतिसाद मिळतो. कोणत्याही व्यावसायिकांना आपल्या स्वतःच्याच वस्तू व सेवांविषयीचा असा वैविध्यपूर्ण आणि रोचक कन्टेंट तयार करणं हे प्रथमदर्शनी अवघड वाटू शकतं.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आपण आपल्या व्यवसायावर लक्ष द्यावं, की असा कन्टेंट तयार करणं आणि प्रकाशित करण्यावर लक्ष द्यावं, अशी द्विधा अवस्था होऊ शकते. मात्र, व्यवसायाचं सोशल मीडिया प्रोफाइल आपल्या मार्केटिंगसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी लागणारा कन्टेंट स्वतः तयार करणे शक्य नसल्यास सेवा देणारे व्यावसायिक सध्या उपलब्ध आहेत. आवश्यक तिथं अशा सेवा जरूर घ्याव्यात. आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर सातत्यानं भरपूर रोचक कन्टेंट प्रकाशित करत राहून फॉलोअर्स वाढवावेत.
प्रोफाइल असे असावे...
Edited By - Prashant Patil