साडीची गंमतकथा : ‘अरु’मुळे ‘राणी’ दिवसभर साडीत!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

प्रत्येक साडी एक गोष्ट घेऊन येते.  सेलिब्रिटींच्या साडीच्या गोष्टी तर खासच असणार. अशाच गोष्टी उलगडणारं हे सदर.

सध्या मोठा ‘टीआरपी’ घेणारी ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतली लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली, ‘‘मला साडी नेसायला जाम आवडते आणि गंमत म्हणजे अरुमुळे सध्या मी दिवसभर साडीतच असते!’’

प्रत्येक साडी एक गोष्ट घेऊन येते.  सेलिब्रिटींच्या साडीच्या गोष्टी तर खासच असणार. अशाच गोष्टी उलगडणारं हे सदर.

सध्या मोठा ‘टीआरपी’ घेणारी ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतली लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणाली, ‘‘मला साडी नेसायला जाम आवडते आणि गंमत म्हणजे अरुमुळे सध्या मी दिवसभर साडीतच असते!’’

मालिकेच्या चित्रीकरणात अतिशय व्यस्त असूनसुद्धा, तिच्या आवडत्या साडीबद्दल बोलायला सांगितल्यावर मात्र ती जाम खूष झाली. अरुंधतीच्या भूमिकेमुळे गेले कित्येक दिवस मधुराणी दिवस-दिवस साडीतच असते आणि विशेष म्हणजे तिचा तो आवडीचा पेहराव असल्यामुळे तो ती अगदी सहजतेनं दिवसभर वागवते. निरनिराळ्या पॅटर्नच्या साड्या आणि त्यावर अतिशय हटके ब्लाऊज यांचा संग्रह म्हणजे तिचा खजिना आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिच्या या खजिन्यातली तिची एक खास साडी म्हणजे, चेन्नईच्या ‘नल्लीज’मधील अप्रतिम अशी ही कांचीपुरम साडी. साड्यांची उच्च अभिरुची असणाऱ्या मधुराणीचं खूप वर्षांपासून एक स्वप्न तिच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये होतं. प्रत्यक्ष चेन्नईला वगैरे जाऊन खास ‘नल्लीज’मधून मस्त दाक्षिणात्य ढंगाची एक तरी पारंपरिक साडी घ्यायचीच. खरं तर गोष्टीतल्या ‘गुलबकावली’च्या फुलाइतकी काही ही गोष्ट असाध्य नव्हती! पण, गेली कित्येक वर्षं अभिनय, लेखन आणि कवितावाचन यात पूर्णपणे बुडालेल्या मधुराणीला ते ‘नल्लीज’ वगैरे काही जमत नव्हतं. गंमत म्हणजे चक्क चेन्नईला शूटिंगसाठी तिचं बऱ्याचदा जाणंही झालं होतं, तरीही नल्लीची दिल्ली दूरच राहत होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पण, अखेर दोन वर्षांपूर्वी चेन्नईतल्या शूटिंगमध्ये तिला चक्क एक दिवस मोकळा मिळाला आणि मग तिनं धूम ठोकली ‘नल्लीज’मध्ये. तिथं एक साडी जणू तिची वाटच बघत होती, पाहताक्षणीच मधुराणी या साडीच्या प्रेमात पडली. दाक्षिणात्य घट्ट सिल्कची गुलबक्षी रंगाची प्युअर कांजीवरम. तेव्हा माधुराणीला स्वप्नपूर्तीचा स्वर्गीय आनंद वगैरे झाला. सुंदर साडी, त्यावर सुंदर प्युअर सिल्कच कॉन्ट्रास्ट डिझायनर ब्लाऊज शिवून तयार झालं आणि मग लगेचच साडी नेसण्याचं प्रयोजनही आलं. मधुराणीच्या मामेभावाचं लग्न. दुग्धशर्करा योग जुळून आला. त्या लग्नात म्हणे नवरीच्या साडीऐवजी मधुराणीच्या या साडीचीच चर्चा होती.

तर, अशी ही बहुचर्चित साडी मधुराणीच्या वॉर्डरोबमध्ये मानाने विराजमान झाली आणि मग मधुराणीच्या ‘बकेट लिस्ट’वर अजून एक टिकमार्क झाला!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write on Saree madhurani prabhulkar