esakal | मेकअप-बिकअप : नववधू प्रिया मी...

बोलून बातमी शोधा

Bridal Makeup
मेकअप-बिकअप : नववधू प्रिया मी...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील लग्नाचा दिवस हा खास असतो. त्या दिवशी आपण स्पेशल दिसावे, असे प्रत्येक मुलीला वाटत असते. त्यासाठीच खास असतो तो वधूचा मेकअप!

मेकअपसाठी काही खास टिप्स

  • मेकअप करण्याआधी चेहऱ्याचे क्लिन्झिंग करून घेणे गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, माती निघून जाते.

  • चेहऱ्याच्या त्वचेला मुलायम करण्यासाठी स्कीन टोन किंवा मॉइश्चरायजर क्रीमचा वापर करून चांगला मसाज करावा.

  • मॉइश्चरायजर जरा सुकू द्या. त्यानंतर बेस प्राइमर लावून घ्या. ब्रशचा वापर करून चेहऱ्यावरील डाग असल्यास ते झाकून टाका. यामुळे संपूर्ण चेहरा एकसारखा दिसू लागेल. डाग झाकण्यासाठी कन्सिलरचा वापर करा.

  • नंतर चेहऱ्यावर फाउंडेशन लावून घ्या. फाउंडेशन चमकरहित असावे. एसपीएफ नसलेले फाउंडेशन लावणे उत्तम ठरू शकते.

  • गाल, नाक व कपाळ उठावदार करण्यासाठी हायलायटरचा वापर करावा. त्यानंतर ब्लशरचा वापर करावा. थोडे हसल्यानंतर वर येणाऱ्या गालावर ब्लशरचा वापर गोलाकार स्वरूपात करावा.

  • मॅचिंग आयशॅडो वापरणे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर आयलायनरचा वापर करावा. शक्यतो आयलायनर हे वॉटरप्रूफ असावे. वरील पापणीला हलके आयलायनर लावावे आणि खालील पापणीला गडद काजळ लावावे. पापण्यांचे एक्स्टेंशन लावावे, अथवा मस्काऱ्याचा योग्य पद्धतीने वापर करून पापण्यांना कर्ली आकार द्यावा.

  • सर्वांत शेवटी मॅचिंग लिपस्टिक लावावी. हल्ली फार गडद लिपस्टिक न लावता (डोळ्यांचा मेकअप गडद असल्यास) हलक्या शेडची लिपस्टिक लावण्याचा ट्रेंड आहे. साडीच्या रंगाला मॅच होईल अशा हलक्या शेडची लिपस्टिकचा वापर करावा.