esakal | मेकअप-बिकअप : चेहऱ्यानुसार करा मेकअप
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

मेकअप-बिकअप : चेहऱ्यानुसार करा मेकअप

sakal_logo
By
प्रशांत पाटील

मेकअप करण्याआधी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा आकार माहीत असायला हवा. कारण आकारानुसार प्रत्येक चेहऱ्याचा मेकअप वेगळा असतो. आज आपण चेहऱ्याच्या आकारानुसार मेकअप कसा करायचा ते पाहूया.

  • गोलाकार चेहरा असल्यास डोळ्यांचा मेकअप गडद असला पाहिजे. गोल चेहरा मोठा वाटतो, तो बारीक दिसण्यासाठी कॉन्ट्युरिंगची महत्त्वाची भूमिका असते. चेहऱ्यावर फाउंडेशन किंवा कन्सिलरच्या मदतीने कॉन्ट्युरिंग करता येते. अशा मुलींनी डोळ्यांवर बोल्ड आयलायनर किंवा डार्क आयशॅडो लावायला हवे. ब्लश लावताना गालांवर तिरके स्ट्रोक्स लावावे. ज्यामुळे तुमचे चिकबोन्स जास्त उठून दिसणार नाहीत आणि स्लीम वाटतील.

  • चौकोनी चेहरा असल्यास कॉन्ट्युरिंगसाठी शिमर नसलेल्या त्वचेपेक्षा थोडे गडद मॅट कलर्सचा वापर करावा. फेसच्या अॅंगलला कव्हर करण्यासाठी खास मेकअप करावा लागेल, जेणेकरून चेहऱ्याचा आकार बॅलन्स होईल.

  • डायमंड आकाराचा चेहरा असल्यास बॅलन्स मेकअप करणे गरजेचे असते. सगळ्यात आधी जॉ लाइन आणि कपाळ थोडे मोठे आणि चिकबोन्स थोडे बारीक करायला हवेत. अशा चेहऱ्यांसाठी ब्लश चिकबोन्सवर लावावे, त्याच्या खालच्या भागात लावू नये. ओठ भरलेले दिसण्यासाठी प्रयत्न करावा, यावेळी मॅट लिपस्टिकचा वापर करावा.

  • ओव्हल आकाराच्या चेहऱ्यावर मेकअप केल्यानंतर चेहऱ्याचा लूकच बदलून जातो. या चेहऱ्यावर कॉन्ट्युरिंग करण्याची गरज लागत नाही.

  • चिकबोन्स जास्त हाइलाइट करायचे असल्यास, चिकबोन्सखाली एक डार्क शेडचे ब्रॉन्झर किंवा ब्लशचा वापर करू शकता आणि गालांच्या अॅपलवर हलक्या शेडचा वापर करा. डोळ्यांच्या बाबतीत आपल्या नैसर्गिक आर्कवर लक्ष द्या.

  • बदामी आकाराचा चेहरा असल्यास चेहऱ्यावरील उंचवटे असलेले भाग - कपाळ, नाकाचे टोक, चिकबोन्स आदींवर थोडे गडद रंगाचे फाउंडेशन लावावे. डोळ्यांसाठी गडद आयलायनरचा वापर करावा. याशिवाय डोळ्यांचा जास्त मेकअप करू नये.

loading image