मेकअप-बिकअप : सौंदर्य ओठांचे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

काहीही मेकअप न करता साधी लिपस्टिक लावली, तरी आपल्याला एक वेगळा आणि चांगला लूक येतो. त्यामुळे ओठांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी ओठांना मॉइश्‍चराइज्ड ठेवणे गरजेचे आहे.

काहीही मेकअप न करता साधी लिपस्टिक लावली, तरी आपल्याला एक वेगळा आणि चांगला लूक येतो. त्यामुळे ओठांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी ओठांना मॉइश्‍चराइज्ड ठेवणे गरजेचे आहे. सध्या तुम्ही छोट्या कामासाठी बाहेर पडणार असला, तरी लिपस्टिकचा वापर सहज केला जातो. 

  • नॅचरल लूक, न्यूड लूक सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यासाठी आधी ओठांना बोटाने मॉइश्‍चरायर लावणे. त्यानंतर लिप बाम किंवा फाउंडेशन प्रायमर लावायला हवे. त्यानंतर लाइट रंगाचा कोट द्यावा. त्याच रंगाचे लिप लायनर ओठांच्या कडांना लावावे व बोटांनी ब्लेंड करावे. खालच्या ओठांच्या मधल्या भागावर लिप ग्लॉस लावावे, त्यामुळे ओठ उठावदार वाटतील. 
  • मॅट लिपस्टिकला थोडीशी शाइन असते, याला मॉइश्‍चरायजरचा फायदा मिळतो. तसेच ही लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर टिकते. 
  • सॅटिन लिपस्टिकला शाइन जास्त असते, यामध्ये मॉइश्‍चरायजर जास्त असते. फार थोडा वेळ ही ओठांवर टिकते. 
  • लिप ग्लॉसमध्ये ग्लिटर असते, यामुळे ओठांना चमक तर येतेच; तसेच दीर्घकाळ टिकून राहते. 
  • ओठांना योग्य आकार देण्यासाठी लिप पेन्सिलचा वापर करावा. लिप पेन्सिलने ओठ कोरडे पडत असल्याने याचे न्यूट्रल किंवा शिमरी शेड निवडावा. 
  • तुम्हाला ओठांसाठी नैसर्गिकरीत्या बनवलेले उत्पादन निवडायचे असल्यास ‘लिप स्टेन’ हा एक उत्तम पर्याय आहे. लिप स्टेन हा नैसर्गिक रंगापासून बनवलेला असतो. त्यामुळे तो जरा महागदेखील असतो. तुमच्याकडे लिप स्टेन असल्यास तुम्ही ओठांवर थेट अप्लाय करू शकता. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Writes about Lips Makeup

Tags
टॉपिकस
Topic Tags: