esakal | मेकअप-बिकअप : गालावरी लाली...
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

मेकअप-बिकअप : गालावरी लाली...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • पावडर ब्लश लावताना चेहऱ्यावर रेषा उमटू नयेत, यासाठी हलक्या हाताने एकाच दिशेने ब्रश फिरवावा.

  • चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास क्रीम ब्लशला प्राधान्य द्यावे. क्रीम ब्लश व्यवस्थित ब्लेंड होत असल्याने यामुळे नॅचरल लूक मिळण्यास मदत होते.

  • लिक्विड किंवा जेल ब्लश लावणार असल्यास त्याचा एक थेंब गालावर आणि दोन छोटे थेंब चिकबोनवर लावून व्यवस्थित ब्लेंड करावे. ब्लेंड करताना ते केसांपर्यंत पसरावे.

  • ग्लॅमरस लूकसाठी चिकबोनवर डोळ्यांच्या जवळ शिमर ब्लश लावावे.

  • ब्लश जास्त झाले आहे, असे वाटल्यास पावडर ब्लशवर पारदर्शक पावडर लावून सेट करावे. क्रीम ब्लश असल्यास, ब्लॉटिंग पेपरने टिपून घ्यावे. लिक्विड किंवा जेल ब्लश लावत असल्यास त्याचा पॅच तयार होतो. ते जास्त झाल्यास काढता येत नाही. त्यासाठी ते लावण्यापूर्वीच प्रमाणात लावले जाईल, याची काळजी घ्यावी.

  • चेहऱ्याचा आकार गोल असल्यास, जेथे गालांचे हाड आहे तेथून वरच्या दिशेने ब्रश फिरवा, त्याने चेहरा थोडा बारीक दिसेल. लांबट चेहऱ्यासाठी गालांच्या उंचवट्याकडून कानापर्यंत ब्रश फिरवा, जेणेकरून चेहरा पसरट दिसायला मदत होईल.

  • अंडाकृती चेहऱ्यावर गालांच्या उंचवट्याकडून वरच्या दिशेला ब्लश लावा, नॅचरल लूक येईल. बदामी आकाराच्या चेहऱ्यावर हनुवटीचा टोकदार भाग थोडा सॉफ्ट करण्यासाठी गालांच्या उंचवट्याखाली लावून वरच्या दिशेने ब्रश फिरवा.

  • त्रिकोणी चेहऱ्यावर हनुवटीचा निमुळता भाग थोडा सॉफ्ट करण्यासाठी गालांच्या उंचवट्याखाली लावून वरच्या दिशेने ब्रश फिरवा. चौकोनी चेहऱ्यावर गालांच्या उंचवट्यावर गोलाकार पद्धतीने लावा, जेणेकरून चेहऱ्याचा कोन असलेला भाग थोडा सौम्य होतो.