मेकअप-बिकअप : मस्कारा वाढवेल डोळ्यांची शोभा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

डोळ्यांची शोभा वाढवण्यासाठी आपण आयलायनर, काजळ, आय शॅडो, आयब्रो मेकअप करीत असतो. परंतु, हे केल्यानंतरही तुम्ही डोळ्यांना मस्कारा न लावल्यास तुमचा डोळ्यांचा मेकअप उठावदार दिसणार नाही. मस्कारा तुमच्या पापण्या फक्त काळ्याभोर करीत नाही, तर त्या जाड व लांब दिसण्यासाठीही त्याचा वापर होतो.

डोळ्यांची शोभा वाढवण्यासाठी आपण आयलायनर, काजळ, आय शॅडो, आयब्रो मेकअप करीत असतो. परंतु, हे केल्यानंतरही तुम्ही डोळ्यांना मस्कारा न लावल्यास तुमचा डोळ्यांचा मेकअप उठावदार दिसणार नाही. मस्कारा तुमच्या पापण्या फक्त काळ्याभोर करीत नाही, तर त्या जाड व लांब दिसण्यासाठीही त्याचा वापर होतो. परंतु, मस्कारा योग्य पद्धतीने लावता न आल्यास, तुमच्या पापण्या एकमेकांना चिकटतात किंवा जाड थर दिसू लागतो. 

  • मस्काऱ्यामधील ब्लॅक रंग सर्वाधिक प्रचलित रंग आहे. अर्थात तुम्ही गोऱ्या असाल व तुमच्या पापण्यांचे केस ब्राऊन असल्यास मात्र तुम्ही ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन रंग वापरू शकता. यामध्ये हल्ली पर्पल रंगही येतो. मात्र, तुम्हाला या रंगांबद्दल आत्मविश्‍वास नसल्यास हा रंग टाळावा. मस्कारा नव्यानेच वापरत असाल, तर ब्लॅक रंग निवडावा. 
  • तुम्हाला कोणत्या प्रकारचा मस्कारा हवा आहे हे ठरवा. म्हणजे पापण्या जाड दिसण्यासाठी, की त्या लांब दिसाव्यात यासाठी हवा आहे? पापण्या लांब दिसण्यासाठी बाजारात ‘लेंथिंग मस्कारा’ मिळतो, तर जाड दिसण्यासाठी ‘व्हॉल्युम मस्कारा’ मिळतो. तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मस्काऱ्याची गरज आहे असे वाटत असल्यास, दोन्हींचे कॉम्बिनेशन असणारा मस्कारा वापरावा.
  • तुम्ही दिवसभर मस्कारा लावणार आहात, किंवा उन्हात फिरणार असल्यास वॉटरप्रूफ मस्कारा वापरावा. हा मस्कारा तुमच्या पापण्यांचा शेप दिवसभर टिकवून ठेवतो. मात्र, वॉटरप्रूफ मस्कारा हा ऑइल बेस्ड असल्याने काढण्यास थोडा अवघड असतो. मेकअप काढण्यासाठी चांगल्या मेकअप रिमूव्हरचा वापर करणार असल्यासच हा मस्कारा वापरावा. डोळ्यांत लेन्स वापरणार असल्यास मात्र हायपोॲलर्जीक मस्कारा वापरावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना मस्काऱ्याची कोणतीही ॲलर्जी होत नाही.
  • मस्काऱ्याचे नेहमी २ ते ३ कोट्स लावावेत. त्यामुळे पापण्या दाट आणि लांब दिसू लागतील. तो लावताना पापण्यांच्या मुळापासून लावावा, अन्यथा पापण्या लहान वाटू शकतात. 
  • मस्कारा शक्यतो रोज लावणे टाळावे. हवे असल्यास काजळ आणि आयलायनरचा वापर करू शकता. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Writes about Makeup Eyeliner

Tags
टॉपिकस
Topic Tags: