esakal | मेकअप-बिकअप : पावसाळ्यात अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

मेकअप-बिकअप : पावसाळ्यात अशी घ्या काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेकअप-बिकअप : पावसाळ्यात अशी घ्या काळजी

  • आठवड्यातून एकदा केळी किंवा पपईचा गर त्वचेला लावावा. यामुळे त्वचा तजेलदार राहते.

  • पावसाळ्यात मेकअप कमीतकमी करा. मेकअप काढल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. चांगल्या स्क्रबचा वापर करावा. अक्रोड, कोरफड याचा स्क्रब असेल तर अधिक योग्य. हळुवारपणे स्क्रब केल्यास त्वचा मुलायम राहते.

  • पावसाळ्याच्या दिवसांत फाउंडेशनऐवजी फेस पावडरचा वापर करावा.

  • आयलायनर किंवा मस्करा वॉटरप्रूफ असावा. जेणेकरून मेकअप पावसात खराब होणार नाही.

  • या मोसमात केसांकडे लक्ष देणे विशेष गरजेचे आहे. या दिवसात केसांवर जेल वापरू नये. कोमट तेलाने मालिश करावे आणि केस दीर्घकाळ बांधून ठेवावे.

  • पावसाळ्यात मेकअपचे ब्रश स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ब्रश कोरड्या व थंड जागी ठेवावे.

  • चेहऱ्यावरचे तेल कमी करण्याकरता ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

loading image