esakal | मेकअप-बिकअप : साधे, सोपे कानमंत्र I Makeup
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

मेकअप-बिकअप : साधे, सोपे कानमंत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेकअप करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यानं खूप फायदा होतो. असेच काही साधे, सोपे कानमंत्र...

तुमचा डोळ्यांचा मेकअप प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो, त्यामुळे डोळ्यांचा मेकअप काळजीपूर्वक करा. मस्करा, काजळ आणि आय लायनर डोळ्यांच्या मेकअपसाठी हवेच हवे, हे कायम लक्षात ठेवा.

रात्रीच्या वेळी आपल्या नकळत आपली त्वचा चांगली होत असते. त्यामुळे रात्री झोपताना चेहऱ्याला मॉइश्‍चरायझर लावून झोपल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

अनेकदा आपल्या हातांची नखे कोरडी पडतात किंवा ती निर्जीव झाल्यासारखी दिसतात. त्यांतील ओलावा आणि चमक टिकवून ठेवायची असले, तर नखांच्या मूळांशी पेट्रोलियम जेली लावल्यास त्याचा फायदा होतो.

मेकअपचा रंग ड्रेसला आणि शूजच्या रंगांना आणि टोनला साजेसा असला पाहिजे. पार्टी, किंवा खास कार्यक्रम ही मिरविण्याची, चमकण्याची आणि मोहक दिसण्याची संधी असते. त्यामुळे अशा वेळी बोल्ड आणि चमकदार रंगांचा वापर करा.

केसांकडे दुर्लक्ष करू नका. केसांची स्टाईल करताना हीट प्रोटेक्‍टर वापरा.

loading image
go to top