आरोग्यसखी : थायरॉइड आहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food

शनिवारची सकाळची ओपीडी चालू असताना हलकेच एका किशोरवयीन मुलीने डोकावून बघितले. तिला बघताच तिच्या चेहऱ्यावरचे दडपण आणि डोक्यातली मरगळ अगदी स्पष्ट जाणवली.

आरोग्यसखी : थायरॉइड आहार

- अवंती दामले

शनिवारची सकाळची ओपीडी चालू असताना हलकेच एका किशोरवयीन मुलीने डोकावून बघितले. तिला बघताच तिच्या चेहऱ्यावरचे दडपण आणि डोक्यातली मरगळ अगदी स्पष्ट जाणवली. तिच्याशी गप्पा मारताना तिने सांगितले, की अचानक लॉकडाउनमध्ये वजन वाढले आहे, पाळी अनियमित होते आहे, केस गळत आहेत.

मग तिचे रक्ताचे सॅम्पल घेतल्यावर त्या सगळ्याचे मूळ समोर आले, हायपोथायरॉइडिझम! योग्य उपचार आणि आहार त्याची जोड दिली, तर आपण ही सगळी लक्षणे थांबवू शकतो, अशी तिला ग्वाही दिली आणि आहारातील बदल सुचवले :

1) आहारामध्ये आयोडाइज्ड मिठाचा वापर करावा.

2) सेलेनियम हा क्षार आहारात मिळण्यासाठी मासे, अंडी, डाळी, नट्सचा वापर करावा- कारण या पदार्थांपासून सेलेनियम मिळते आणि ते अॅन्टीऑक्सिडंट म्हणून काम करते.

3) झिंक हा क्षार थायरॉइड ग्रंथीला अॅक्टिवेट करतो, म्हणून आहारात पालेभाज्या, फळे, मासे, तेलबिया यांचा वापर करावा.

4) आहारामध्ये शोषणक्षमता उत्तम असणारी प्रथिने- उदाहरणार्थ, अंड्यातले पांढरे, चिकन, डाळी, दही, पनीर व समावेश करावा.

5) आहारातून तेलकट, बेकरीचे पदार्थ, फरसाण, चिप्स यांसारख्या पदार्थांचा वापर टाळावा.

6) चोथा (Fiber) मिळण्यासाठी भाज्या, फळे, कोंडायुक्त पीठ यांचा वापर आहारात करावा.

आहारातून काही पदार्थ ज्यांना ‘गॉयट्रोजन्स’ असे म्हणतात ते वगळावेत, कारण ते थायरॉइड ग्रंथीचे काम मंदावतात -

 • सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ (उदाहरणार्थ, सोयाचे दूध, टोफू हे पदार्थ) टाळावेत.

 • कोबी, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोलीसारख्या भाज्या टाळाव्यात.

 • फास्टफूड, जंकफूड, बेकरीचे पदार्थ खाऊ नयेत.

 • कॉफी, मद्यासारखी पेये टाळावीत.

यावरून मला सहा महिन्यापूर्वी क्लिनिकमधली अजून एक पेशंट आठवली. लग्न ठरलेली ही तरुणी खूप तणावाखाली दिसत होती. तिच्याशी बोलताना ती सारखा घाम पुसत होती, अस्वस्थता होती, डोळे खोल गेलेले होते आणि वजनही खूप कमी झाले होते. थायरॉइड ग्रंथीच्या बाबतीतील हा दुसरा आजार होता- त्याचे नाव हायपर थायरॉइडिझम. आहारातील बदल व योग्य उपचारांनी चांगला बदल लगेच दिसायला लागला. तिला सुचवलेले आहारातील बदल

 • आहारामध्ये ताज्या भाज्या व फळांचा वापर करावा.

 • आयोडिन नसणारे मीठ आहारात घ्यावे.

 • डाळी, कडधान्ये, चिकन, अंड्याचा बलक व प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर करावा.

 • नट्स व तेलबिया उदाहरणार्थ - जवस, तीळ, सूर्यफूल बी यांचा वापर करावा.

हायपर थायरॉइडिझमसाठी हे पदार्थ टाळा

 • आयोडिनयुक्त मीठ.

 • मीठ लावलेले मासे, झिंगा, कोळंबी इ. पदार्थ.

 • अंड्यातला पिवळा भाग, सोयाबीनचे पदार्थ.

 • सोडा, चॉकलेट, चहा, कॉफी इ. पेये.

 • नायट्रेट्सयुक्त पदार्थ (उदाहरणार्थ, बीट, भोपळा, बडिशेप).

(लेखिका आहारविषयक तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Avanti Damale Writes Health Friend Thyroid Food

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top