ॲप + : वॉsssव्व...! क्‍या सेल्फी है...!!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

तुम्हाला सेल्फी काढायला आवडतं...? चला तर आज पाहूया BeautyPlus हे ॲप. 
हे ॲप आहे मल्टीपर्पज. इथं फोटो, व्हिडिओंच्या गमती करता येतात. व्हॉटस्ॲप स्टेटसवर आज काय दाखवायचं, सुचत नसेल, तर ॲपमधल्या Travel Around The World वर क्‍लिक करा. सुंदर डेस्टिनेशनचं बॅकग्राऊंड तुमच्या सेल्फीला मिळेल! सेल्फी छानसा एडिट केला, तर सगळ्यांना सरप्राईज देता येईल...! 

फोटो एडिट जरूर करा. ॲपमध्ये Retouch नावाचं सेक्‍शन आहे. इथं खूप फीचर्स आहेत. उदाहरणार्थ ः फोटोत गाल जरा जास्तच फुगलेले आणि ‘डबल चीन’ दिसतेय, तर Slim आणि Chin  वापरून मस्त लुक देता येईल फोटोला! चेहरा आपला, मोबाईल आपला, मग फोटो का वाईट येऊ द्यायचा? नाही का! 

ॲपमध्ये सेल्फीचं बॅकग्राऊंड हवं तसं एडिट करता येतं. क्रॉप, रोटेट अशी फीचर्स आहेतच; शिवाय ब्रोकन लेन्स नावाचं अफलातून फीचर आहे. घरातल्या सोफ्यावर बसून फोटो काढलाय आणि मागं न आवरलेली भांडी-कपडे वगैरे पडलेले असतील, तरी चालेल. स्विर्ल फीचर वापरलं, तर ती भांडी-कपडे अशा काही अँगलमध्ये फिरतील, की फोटो पाहणाऱ्याला तुम्ही जत्रेतल्या मोठ्या झोपाळ्यात बसलाय असं वाटून जाईल! 

ॲपमध्ये अजून अशी काही भन्नाट फीचर आहेत; जी वापरूनच पाहायला हवीत. आणि हो, पैसे खर्चून ॲप विकत घ्यायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा... 

अशी काही कूल ॲप्स तुमच्या मोबाईलवर असतील, तर मैत्रिणींसोबत शेअर करा maitrin@esakal.com वर. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beauty plus app for selfie