esakal | बेला लोळगे 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र' विजेती । Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेला लोळगे

बेला लोळगे 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र' विजेती

sakal_logo
By
शब्दांकन : अरुण सुर्वे

पुणे: मला कॉलेजमध्ये असताना वेगवेगळे पदार्थ खायची आवड होती. पण, जशी मी मॉडेलिंगमध्ये माझी वाटचाल सुरु केली, तसे जिम व वर्क आऊटवर भर दिला. तसा माझा हेल्दी खाण्याचा प्रवास सुरु झाला. पण, माझा प्रचंड आवडीचा पदार्थ ज्याला मी कधीच नाही म्हणू शकणार नाही, तो म्हणजे गुलाब जामून. मला गोड पदार्थ फारच आवडतात. 'स्वीट टूथ ' म्हणतात तस आणि लग्न समारंभांमध्ये मिळणारे खव्याचे जामून , त्यांची तर बातच काही और आहे.

हेही वाचा: पुसद: तलाठी ते सहाय्यक वनसंरक्षक आशिषची उंच भरारी !

विविध शूट्समुळे वेगवेगळ्या शहरात जायची संधी मिळते. मी जेव्हाही हैदराबादला जाते, त्यावेळीतिथली बिर्याणी मी आवर्जून खाते. पॅराडाइस आणि बावर्ची हे दोन अवडतीचे ठिकाण. मला कूकिंगची खरी मजा लॉक डाउनमध्ये कळली . मी चार वर्ष हॉस्टेलला राहून नुकतेच घरी परतले होते, जेव्हा लॉकडाउन लागले. मग आई रोज काहीतरी माझ्या आवडतीचा पदार्थ करायची. हळूहळू मी ही सगळा स्वयंपाक करायला शिकले.

मला व्हाइट सॉस पास्ता करायला खूप आवडतो आणि तो छान जमतो. माझ्या हातचा पास्ता सगळे खूप आवडीने खातात. आईने एकदा नानखाटाई घरी करून बघायचं ठरवलं . मी तेव्हा जरा लहानच होते. मला आईला बघून भलतीच मजा वाटत होती. आणि त्या मजे मजेत मी हट्ट करून गरजेपेक्षा खूपच जास्त बटर त्यात टाकून दिलं. मग काय! नान खटायी तर दूरच राहिली , शेवटी त्याचे शंकर पाळे करावे लागले. आणि आईने रपटे दिले ते तर वेगळेच.

हेही वाचा: आयपीएलचा रन-संग्राम: Delhi Vs Mumbai ; पाहा व्हिडिओ

मला खरोड्या, सांडगे, लोणची हे पदार्थ कधीच नाही आवडले. आमच्या घरी या गोष्टी सगळे खूप चवीने खातात. पण मला कधीच नाही खावे वाटले. आईने केलेला साधा वरणभात पण मी फार चवीने खाते. हॉस्टेलला गेल्यापासून तर त्याची माया अजून समजली. पण तिने केलेली उंबराची भाजी खूप आवडते. (बेसन पारी आणि त्यात कांदा तीळ मसाले याचं सरण. हे उंबर मग रस्सा भाजीमध्ये सोडतात) उंबराची भाजी मी फार कमी ठिकाणी खाल्ली आहे आणि ज्या प्रकारे माझी आई करते, त्यात ती नेमकं काय वेगळं करते हे नाही माहित, पण उत्कृष्ट करते!

शब्दांकन : अरुण सुर्वे

loading image
go to top