
डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्कर्ट्स घालायलाही आवडतात, कारण त्यामध्ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते.
माय फॅशन : ‘शरीराला साजेसे पोशाख हवेत’
- चारुल मलिक
डेनिम हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे, हा प्रकार सर्वांवर शोभून दिसतो. मला शॉर्ट स्कर्ट्स घालायलाही आवडतात, कारण त्यामध्ये मला कम्फर्टेबल आणि हलके वाटते. माझी मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये मी सर्व पाश्चिमात्य पोशाख घालते, ज्यामधून मी स्टायलिश, उत्साहपूर्ण व कम्फर्टेबल वाटते.
मी अविचाराने ट्रेंड्स फॉलो करत नाही. त्याऐवजी मी मला शोभून दिसणारे व योग्य वाटणारे पोशाख घालते. पोशाख घालताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की ते नेहमीच चांगल्या स्थितीत असले पाहिजेत. तुम्ही शरीराला फिट होणारे पोशाख घालत असाल, तर अन्य गोष्टींचीही काळजी घ्या, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही. तसेच साडी नेसताना तुमच्या शरीरयष्टीनुसार योग्य फॅब्रिक निवडणे महत्त्वाचे आहे; पण माझ्या मते, साडीसोबत हिल्स घालणे आवश्यक आहे, कारण त्यामधून तुम्हाला आकर्षक लूक मिळतो आणि तुमच्या शरीराची ठेवणदेखील सुधारते. माझ्या मते, दिवसा साडी नेसताना अधिक भडक रंग टाळले पाहिजे.
माझा एकच फॅशन फंडा आहे, तो म्हणजे आपल्या शरीराला साजेसा पोशाख घालणे. मी ब्रॅण्डेड किंवा नॉन-ब्रॅण्डेडला अधिक महत्त्व देत नाही. मी दिसायला सुंदर व मोहक बनवणारे पोशाख घालते. माझ्या मते, आपण मूडनुसार रंगांची निवड करावी. सायंकाळच्या वेळी काळ्या रंगासारखे गडद रंगांचे पोशाख घालू शकता आणि दिवसा पेस्टल व फ्लोरलसारख्या सौम्य रंगांचे पोशाख घालू शकता. मात्र, तुमच्या रंगानुसार पोशाखांच्या रंगाची निवड करणे योग्य आहे.
मला दीपिका पदुकोण खूप आवडते. ती उंच आहे आणि तिची मोहक शरीरयष्टी आहे. ती परिधान करणाऱ्या पोशाखांमधून खूपच आकर्षक दिसते. मी तिची स्टाइल व फॅशन आत्मसात करते. ती सतत प्रयोग करत राहते आणि याच गुणामुळे मी तिच्याकडे माझी फॅशन आयकॉन म्हणून पाहते.
फॅशन टिप्स
कम्फर्टेबल व आत्मविश्वासपूर्ण वाटेल असे पोशाख परिधान करा.
तुमच्या शरीरयष्टीनुसार पोशाख परिधान करा.
गरजेपेक्षा अधिक अधिक आभूषणे घालू नका.
तुमच्या मूडनुसार पोशाखांची निवड करा.
ज्या पोशाखांची निवड कराल, त्या पोशाखांबाबत समाधानी राहा.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)
Web Title: Charul Malik Writes My Fashion Wear Clothes That Suit The Body
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..