मुलांची अंथरुणात लघवी आणि उपचार 

baby
baby

या उपचारांत पालक , मूल आणि घरातील इतर सदस्यांचे समुपदेशन महत्त्वाचे ठरते. 

ही समस्या चुकीच्या पालकत्वामुळे नाही, तर चुकीच्या शू-शी करण्याच्या प्रशिक्षणामुळे (टॉयलेट ट्रेनिंग) होत नाही किंवा यात मुलाचीही काही चूक नाही, या विषयी समुपदेशन गरजेचे असते. मुलाला असे होतच असते आणि याचे उपचार आपण मिळून करू, हे पालकांना समजावून सांगावे लागते. घरात आजी, आजोबा व इतरांनी या विषयी जाहीर चर्चा किंवा मुलाशी चर्चा करू नये. तसेच या सवयीविषयी मुलाला कधीही रागावू व मारू नये. 

1 संध्याकाळी सहानंतर चहा आणि कॉफी देऊ नये, तसेच संध्याकाळी सहानंतर पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे. सहानंतर २५० ते ३०० मिली पाणी पिणे योग्य आहे. रात्री झोपताना पाणी देणे टाळा. दिवसातील ८० % पाणी दुपारी चार वाजेपर्यंत प्यावे व ४ ते ६ वेळांत १९ % व ६ नंतर १ % पाणी पिण्याचे प्रमाण ठेवावे. दिवसा सहा वाजेपर्यंत किमान ६ वेळा लघवीला जावे. 

2. दिवसा लघवी आल्यावर काही काळ रोखून धरता येते का, याचीही सवय लावावी. जमेल तशी लघवी थोडा वेळ ४ ते ५ मिनिटांपर्यंत रोखून धरल्यास मूत्राशयाची क्षमता वाढण्यास मदत होते. हे बळजबरीने नाही, तर आनंदाने व मुलाच्या स्वयंस्फूर्तीने करून घ्यावे. 

3. मूल झोपण्याआधी त्याला लघवी करायला आपण सांगतोच, पण अंथरून ओले करणाऱ्या मुलांना झोपण्याआधी लघवी करून आल्यावर परत एकदा लघवी करायला सांगावे. या दोन वेळा लघवी करण्याला ‘डबल वायडिंग’ असे म्हणतात. म्हणजे, सलग दोन वेळा लघवीला जाणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कधी कधी सुरवातीला जेवढी लघवी केली होती तेवढीच लघवी तो पुन्हा करतो. याचे कारण असते मुलाच्या मुत्राशयामध्ये रेसिड्यूल युरीन, म्हणजे साठलेली लघवी. दुसऱ्यांदा लघवी केल्यानंतरही ही लघवी बाहेर पडल्याने अंथरूण ओले करण्याचे प्रमाण कमी होते. 

4. झोपण्याआधी सकारात्मक संकल्प करायला सांगणे. संकल्प हा वतर्मानकाळात असावा. मी आज अंथरून कोरडे ठेवेले आहे, असा सकारात्मक संकल्प करायला सांगणे. आज मी अंथरून ओले करणार नाही, हा नकारात्मक संकल्प ठरतो. 

5. सहसा मुले लवकर झोपतात आणि आई-वडील त्यांच्यानंतर २ ते ४ तासांने झोपतात. आई-वडीलांनी झोपण्याआधी मुलाला झोपेतून उठवून लघवी करायला उभे करायचे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

6. स्टार टेक्निक ही एक पद्धत संशोधनामध्ये सिद्ध झाली आहे. एक वेगळे कॅलेंडर घ्यायचे व ज्या दिवशी मुलाने अंथरून ओल केलेले नाही, त्या तारखेला एक स्टार मारायचा. महिन्याच्या शेवटी जितके दिवस मुलाने अंथरून ओल केले नाही, तितके स्टार मोजायचे आणि त्या हिशोबाने त्याला काहीतरी बक्षीस ठरून द्यायचे. तुला या महिन्यामध्ये १० स्टार मिळल्यास तुला तुझ्या आवडीची गोष्ट देऊ किंवा तुला एखाद्या पर्यटनस्थळाला घेऊन जाऊ अशा साध्या गोष्टी बक्षिस म्हणून द्याव्यात. बक्षीस देताना चॉकलेट, व्हिडिओ गेम्स अशा घातक गोष्टी देऊ नका. 

7. सगळ्यांत महत्त्वाचे, मुलाला याबद्दल रागवू नका व या समस्येबद्दल त्याच्याशी जास्त चर्चा करू नका. तसेच, तुम्ही त्याचे कपडे बदलता, बेडशिट बदलता तेव्हा न रागावता त्याला या कृतींमध्ये सामावून घ्या. त्याची याच्यासाठी मदत घ्या. 

वरील उपचार ६ महिने सतत केल्यास ही मुले पूर्ण बरी होतात . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com