किचन + : डीप फ्रायसाठी झारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

उन्हाळ्याच्या दिवसांत जेवताना तोंडी लावण्यासाठी पापड, कुरर्डया, बटाट्याचे पापड, वेफर्स असे पदार्थ आवश्‍यकच असतात. हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर गरम तेलात तळताना तारांबळ उडते. पापड किंचित ओलसर असल्यास तेल अंगावर उडण्याचाही धोका असतो. तळण्याचे काम नेहमीच्या झाऱ्याने करण्याऐवजी डीप फ्राय मेशने (जाळी) केल्यास काम सोपे होते आणि धोकाही काही प्रमाणात कमी होतो.

पुणे उन्हाळ्याच्या दिवसांत जेवताना तोंडी लावण्यासाठी पापड, कुरर्डया, बटाट्याचे पापड, वेफर्स असे पदार्थ आवश्‍यकच असतात. हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर गरम तेलात तळताना तारांबळ उडते. पापड किंचित ओलसर असल्यास तेल अंगावर उडण्याचाही धोका असतो. तळण्याचे काम नेहमीच्या झाऱ्याने करण्याऐवजी डीप फ्राय मेशने (जाळी) केल्यास काम सोपे होते आणि धोकाही काही प्रमाणात कमी होतो. विशेषतः, कढईत तळलेले दाण्यांसारखे पदार्थ न सांडता, तेल न उडू देता आणि पूर्णपणे निथळून बाहेर काढण्यासाठी हा झाऱ्या खूपच उपयोगाचा आहे आणि त्यासाठी तो तुमच्या स्वयंपाक घरात हवाच.

वैशिष्ट्ये
1) झाऱ्यातील पदार्थ घट्टपणे धरून ठेवण्यासाठी वरील बाजूस चिमट्याप्रमाणे पदार्थ पकडण्यासाठीची सोय.
2) एकमेकांना छेदणाऱ्या तारा असलेली जाळी. त्यामुळे पदार्थ पुन्हा तेलात पडत नाही आणि तो बाहेर काढणे सोपे जाते.
3) मासे, दाणे, दाळी आदी तळताना त्याला लागलेले तेल सहज निथळून काढता येते.
4) स्टेनलेस स्टीलचे बनवलेले व वजनाला हलके असल्याने वापरण्यास सोपे. 
5) हॅंडलसह ११.२ इंच लांबी. जाळीचा व्यास ३.९४ इंच.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deep Fry Zara

Tags
टॉपिकस
Topic Tags: