esakal | ब्युटी पार्लरच्या आर्टिस्टंची नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Dissatisfaction with the beauty parlor artist

सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्यासाठी काही जणांचा कल असतो तो ब्युटी पार्लर कडे. हल्ली ब्युटी पार्लर्स अगदी छोट्या गल्लीबोळात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. लग्नसराई म्हणलं तर सर्वजण सुंदर दिसण्यासाठी त्यांची पावले ब्युटी पार्लरकडे वळवतात. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे विवाह रद्द झाले असल्यामुळे ब्युटी पार्लरचे आर्टिस्टंचा सिझन असा रिकामाच गेल्याने ते नाराज झाले आहेत.

ब्युटी पार्लरच्या आर्टिस्टंची नाराजी

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्यासाठी काही जणांचा कल असतो तो ब्युटी पार्लर कडे. हल्ली ब्युटी पार्लर्स अगदी छोट्या गल्लीबोळात सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. लग्नसराई म्हणलं तर सर्वजण सुंदर दिसण्यासाठी त्यांची पावले ब्युटी पार्लरकडे वळवतात. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे विवाह रद्द झाले असल्यामुळे ब्युटी पार्लरचे आर्टिस्टंचा सिझन असा रिकामाच गेल्याने ते नाराज झाले आहेत.
अत्याधुनिकीकरणामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपलं केवळ नीटनेटक राहणं हे पुरेसं नसून आपणं चारचौघांमध्ये वेगळं आणि आकर्षणं दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणा-या असल्या तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षण दिसणं आणि त्यासाठी नीटनेटके दिसण्यासाठी अनेकजण ब्युटी पार्लर मध्ये जात असतात. दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये लग्नसराई सुरू झाल्यावर गल्लीबोळांमध्ये सनई, ढोल, बँजोचा आवाज घुमत असतो. लग्न घरात विवाह सोहळ्याचा मोठा गाजावाजा असतो. सर्व कुटुंब परिसर गजबजून जातो. मात्र यंदा कोरोनाव्हायरस मुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे. त्यामुळे अनेकांची विवाह मुहूर्त रद्द करण्यात आले आहेत तर काही पुढे ढकलण्यात आले आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 त्यात वधूपासून ते घरातील सर्व महिला आपण सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जात असतात. लग्नसराईची धामधूम सुरू झाली की विशेषतः समस्त स्त्रीवर्गाचा उत्साहाला यावेळी उधाण आलेले असते. नवनवीन फॅशनच्या साड्या, ड्रेस, दागिने याचबरोबर ब्युटी पार्लरच्या फेऱ्या देखील सुरू असतात. नवनवीन कपडे त्यांच्या जोडीच्या ॲक्सेसरीज मेकअप यांच्या जोडीने लग्नाला उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाच्या प्रसाधने हा आवडीचा विषय असतो. नववधू आणि जवळच्या नातेवाईकांच्या मनात असते की आपण लग्नात सुंदर दिसावे. आणि आपल्याला अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट्स मिळाव्यात अशी इच्छा सर्वांचीच असते. परंतु लाॅकडाऊनमुळे सिझन असाच जात असल्याने ब्युटी पार्लरच्या आर्टिस्टंची नाराजी व्यक्त करत आहे. तसेच ब्युटी पार्लर मधील कलाकारांच्या हातातील काम बंद पडले आहे. लग्नसराईच्या हंगामातच हातातील काम निसटले, त्यामुळे ब्युटीपार्लर वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. त्यात सध्या कोरोना संकटामुळे काहींना अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करावा लागत आहे. तर काहींनी आतापर्यंत ऑनलाइन लग्नही  उरकले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे याचा फटका विवाह सोहळ्यांनाही बसून आला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. हातात असलेले ऑर्डर निसटत असल्याने आणि सध्या एखादं दुसरं येणारे क्लाईंट्स येणं बंद केले आहे. 

का आहे नाराजी
दिवाळी सुट्टी आणि उन्हाळ्या सुट्टीमध्ये आमचा ब्युटी पार्लरचा सिझन सुरू असतो. यासाठी लग्नसराईमुळे अनेकजण दोन-तीन महिन्यांपासूनच बुकिंग करण्यास सुरूवात केलेली असतात. परंतु कोरोना विषाणूमुळे लग्नकार्य पुढे ढकलले गेले आहे. त्यामुळे ब्युटी पार्लरचा सिझन रिकामाच जात आहे कलाकारांनीही नाराजी व्यक्त करत आहे. 
- रेखा पारेकर, ब्युटी पार्लर आर्टिस्ट


दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीतील हंगामावेळी विवाह सुरू होतात. त्यावेळी वधू आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक जण ऑर्डर घेऊन आमच्याकडे येतात. परंतु यावर्षी सगळं काही बंद आहे. या वर्षी ऑर्डर येवून सुद्धा आमचा सिझन असाच रिकामा गेला आहे.
- आरती वडे, ब्युटी पार्लर आर्टिस्ट

loading image