esakal | आईशी संवाद  : संगोपनाची कांगारू नीती 
sakal

बोलून बातमी शोधा

आईशी संवाद  : संगोपनाची कांगारू नीती 

भारतात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी करता येण्यासारखी बिनखर्चाची व नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. 

आईशी संवाद  : संगोपनाची कांगारू नीती 

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

भारतात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी ‘कांगारू मदर केअर’ ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी करता येण्यासारखी बिनखर्चाची व नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांगारू मदर केअर म्हणजे काय?
आई किंवा वडिलांनी नवजात बालकाला एका विशिष्ट प्रकारच्या पिशवीमध्ये संगोपनासाठी दिवसातून जास्तीत जास्त वेळ ठेवणे, म्हणजेच कांगारू मदर केअर. ही पद्धत जगातल्या अनेक अतिदक्षता विभागांमध्ये यशस्वीपणे वापरली 
जात आहे.

कांगारू मदर केअरचे मार्गदर्शन तत्त्व 
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानात उपचारादरम्यान आई व बाळाला वेगळे करण्याची चुकीची पद्धत रूढ झाली आहे. कांगारू मदर केअरमध्ये आई व बाळाला सतत एकत्र ठेवून दोघांच्या त्वचेत नेहमी संपर्क येऊ देणे व त्या माध्यमातून बाळाचे तापमान, शारीरिक व मानसिक पोषण व्हावे हे मूलभूत तत्त्व पाळले जाते.

कांगारू मदर केअर देण्याची पद्धत...
या पद्धतीत बाळाला एका विशिष्ट प्रकारच्या पिशवीत, बाळाचे शरीर दोन स्तनांमध्ये येईल व पाय पिशवीतून दोन्ही बाजूला ठेवता येतील अशा पद्धतीने ठेवले जाते. पिशवी बंधाने आई किंवा वडिलांच्या गळ्याच्या व पाठीमागे बांधण्यात येते. कांगारू ज्या प्रकारे बाळाला छातीशी ठेवते, तसेच ठेवता येते. हिवाळ्यामध्ये पालक लोकरीचा गाऊन किंवा शाल घेऊ शकतात. १.५ किलोपेक्षा कमी वजनाच्या तसेच, २.५ किलो वजनाच्या सर्व बालकांसाठी ही पद्धत वापरता येते. बाळाला असे झोळीत ठेवल्यावर कमीत कमी एक तास बाहेर काढू नये, त्यामुळे तेवढ्याच वेळात नवजात बालकाच्या झोपेची एक सायकल पूर्ण होते.

कांगारू मदर केअरचे फायदे 
पालकांसाठी फायदे 

यामुळे बाळाशी भावनिक नाते वाढते. आईच्या संगोपनाविषयी आत्मविश्वास वाढतो. दूध देण्याचे प्रमाण वाढते व स्तनपान अधिक प्रभावीपणे होते.

काम करतानाही कांगारू संगोपन देता येते.  
वडिलांचा संगोपनातील सहभाग वाढतो.

आधुनिक वैद्यकीय उपचार खर्चीक व केवळ तंत्रज्ञानाधिष्ठित होत असताना कांगारू मदर केअरसारखी मस्त व स्वस्त पद्धत जास्त प्रमाणात अंगीकारली जावी.

बाळासाठी 
आईच्या गर्भात असल्यासारखे वातावरण व सतत आईच्या हृदयाचे ठोके ऐकायला येत असल्याने बाळाला अधिक सुरक्षित वाटते. 

बाळाच्या त्वचेचे तापमान १ डिग्रीने कमी झाले की, लगेचच आईच्या त्वचेचे तापमान १ डिग्रीने वाढते  व नैसर्गिकरीत्या तापमान नियंत्रित राहते.

सतत स्तनांमध्ये राहिल्याने स्तनपानाचे प्रमाण वाढते, गरज असेल तेव्हा स्तनपान करता येते.

जन्माच्या पहिल्या तासात कांगारू मदर केअर दिल्याने पहिल्या तासाच्या स्तनपानाची हमी असते.

कांगारू संगोपनादरम्यान बळावर लक्ष ठेवणे सोपे जाते व उलटी, झटके अशा गोष्टींचे लवकर निदान होऊन अचानक व आईच्या नकळत होणारा बाळाचा मृत्यू टळतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की, कांगारू संगोपनात बाळाच्या हृदयाचे ठोके, श्वासाची गती नॉर्मल राहण्यास मदत होते, प्रतिकारशक्ती वाढते व झोप चांगली लागते. 

loading image