esakal | किचन + : फ्रेंच फ्राय पोटॅटो स्लायसर
sakal

बोलून बातमी शोधा

french fry potato slicer

फ्रेंच फ्राइज हा कुरकुरीत, गरमागरम पदार्थ लहानग्यांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीचा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून हा पदार्थ मुले प्रामुख्याने ऑर्डर करतात. अगदी गरम असतानाच सॉसबरोबर खायचा हा पदार्थ गार झाल्यावर कुरकुरीतपणा हरवून बसतो.

किचन + : फ्रेंच फ्राय पोटॅटो स्लायसर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Entertainment फ्रेंच फ्राइज हा कुरकुरीत, गरमागरम पदार्थ लहानग्यांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीचा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून हा पदार्थ मुले प्रामुख्याने ऑर्डर करतात. अगदी गरम असतानाच सॉसबरोबर खायचा हा पदार्थ गार झाल्यावर कुरकुरीतपणा हरवून बसतो.

त्यामुळेच तो हॉटेलमधून घरी फारसा ऑर्डर केला जात नाही. हा पदार्थ घरी बनवणे कधीही चांगले. ताज्या तेलात तळल्याने घशाला सुरक्षित व गरम खायला मिळत असल्याने तो घरीच बनवणे प्रत्येक आईची इच्छा. मात्र, घरातल्या घरात बटाट्याच्या लांब आणि उभ्या स्लाइस करणे कठीण जाते. त्यासाठी फ्रेंच फ्राय पोटॅटो स्लायसर नक्कीच उपयोगी पडू शकतो. या लॉकडाउनच्या काळात घरातील छोट्या-मोठ्यांना गरमा गरम फ्रेंच फ्राइजचा आनंदही लुटता येईल. 

असा आहे स्लायसर

  • दणकट सक्शन बेस आणि सिंगल पुश लिव्हरमुळे वापरण्यास अगदीच सोपा. 
  • कटरमध्ये बटाटा ठेवून जोरात खाली दाबल्याबरोबर स्लाइस होतात.- नेहमीच्या, तसेच अगदी पातळ प्रकारात बटाटा स्लाइस करता येतात. 
  • बटाट्याबरोबरच गाजर, काकडीच्याही स्लाइस करता येतात. 
  • सर्व भाग वेगळे करता येतात व वाहत्या पाण्याखाली सहज स्वच्छ करता येतात.
loading image
go to top