esakal | पालक- मूग ढोकळ्याचे आरोग्यासाठी हे आहेत फायदे (video)
sakal

बोलून बातमी शोधा

How Make healthy Moog Dhokla

साहित्य : एक वाटी मोड आलेले हिरवे मूग, एक वाटी पालक, दीड वाटी रवा, एक मूठ पुदिना, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक इंच आले, दोन लिंबू, दोन चमचे तीळ, चवीनुसार मीठ व साखर, तेल, ओला किसलेला नारळ, कोथिंबीर. 

पालक- मूग ढोकळ्याचे आरोग्यासाठी हे आहेत फायदे (video)

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : लहान मुलांना आरोग्यासाठी काय महत्त्वाचे असतं याचे माहित नसते. त्यांना खाताना फक्त टेस्ट हवी असते. मात्र, आईंनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन पदार्थ बनवले पाहिजेत. हेच ओळखून सोपाली फताडे या पालक- मूग ढोकळा बनवत आहेत. हा ढोकळा फक्त मुलांसाठीच नाही तर इतरांना सुद्धा उपयुक्त आहे.
यामध्ये वापरलेले साहित्य हे नक्कीच आरोग्यसाठी फायद्याचे आहे. यामध्ये काय आहे साहित्य आणि त्याची कृती वाचा... आणि व्हिडीओ ही पहा....
 
साहित्य : एक वाटी मोड आलेले हिरवे मूग, एक वाटी पालक, दीड वाटी रवा, एक मूठ पुदिना, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक इंच आले, दोन लिंबू, दोन चमचे तीळ, चवीनुसार मीठ व साखर, तेल, ओला किसलेला नारळ, कोथिंबीर. 

फोडणी करता साहित्य- तेल, जिरे, मोहरी, हिंग, तीळ 
 
कृती : प्रथम पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यावा. हिरवा मूग, पालक, पुदिना, मिरच्या, आले, कोथिंबीर एकत्र करून घेणे. त्यात एक लिंबू पिळून एक वाटी पाणी घालणे. त्यानंतर मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे. हे सर्व एका बाऊलमध्ये काढून त्यात एक चमचा तेल, मीठ, साखर घालून हलवावे. रवा घालून दोन-तीन मिनिटे ठेवावे. गॅसवर कढईत पाणी उकळत ठेवावे. ताटाला सगळीकडे तेलाचा हात फिरवून घेणे. पाणी उकळायला लागले की, ढोकळ्याच्या पिठात एक चमचा सोडा घालून त्यात दोन चमचे लिंबाचा रस घालून फेटून घ्यावे. लगेच तेल लावलेल्या ताटात ओतून दहा मिनिटे वाफवून घ्यावे. गॅस बंद करून ढोकळा थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करणे. त्यानंतर तयार झालेल्या ढोकळ्यावर जिरे, मोहरी, तीळ आणि हिंगाची फोडणी करावी आणि त्यावर ओला किसलेला नारळ आणि कोथिंबीरने सजावट करावे. हा खमंग आणि पौष्टिक ढोकळा तयार.

loading image