esakal | ग्रुमिंग + : तीन प्रॉडक्टसह झटपट मेकअप
sakal

बोलून बातमी शोधा

Makeup

मेकअपसाठी नेहमीच पार्लरला जाऊन मेकअप करुन घेणे शक्य नसते. शिवाय रोज मेकअप करण्यासाठी काही टिप्स माहित असणेही गरजेचे आहे. मेकअप करण्यासाठी भरपूर उत्पादने, पैसा आणि वेळ लागतो हे पूर्णपणे खरे नाही. फक्त तीन प्रॉडक्टसह झटपट रोजचा मेकअप कसा करावा, हे जाणून घेऊया. सर्वांत आधी तुमची रोजची किंवा आवडीची फेस क्रिम लावा.

ग्रुमिंग + : तीन प्रॉडक्टसह झटपट मेकअप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

 मेकअपसाठी नेहमीच पार्लरला जाऊन मेकअप करुन घेणे शक्य नसते. शिवाय रोज मेकअप करण्यासाठी काही टिप्स माहित असणेही गरजेचे आहे. मेकअप करण्यासाठी भरपूर उत्पादने, पैसा आणि वेळ लागतो हे पूर्णपणे खरे नाही. फक्त तीन प्रॉडक्टसह झटपट रोजचा मेकअप कसा करावा, हे जाणून घेऊया. सर्वांत आधी तुमची रोजची किंवा आवडीची फेस क्रिम लावा. मुख्य मेकअपला सुरुवात करण्याआधी आणि त्वचेवर थेट लावण्याआधी क्रिम लावणे गरजेचे आहे. ते कोणत्याही प्रकारचे मोश्चर्यराइझर, क्रिम, फेस लोशन, सनस्क्रिन लोशन असल्यास हरकत नाही. त्यामुळे त्वचा काही प्रमाणात सुरक्षित राहते.

लुसिंग पावडर -
मेकअप करताना सुरुवातीला लुसिंग पावडर लावावी. ती निवडताना तुमच्या स्किन टोनप्रमाणे ती निवडावी. वेगवेगळ्या शेड्समध्ये ती उपलब्ध असते. रोजचा मेकअप करण्यासाठी बेस म्हणून लुसिंग पावडर योग्य आहे. फ्लफी ब्रशने चेहऱ्यावर आणि मानेला ती लावावी. मानेचा आणि चेहऱ्याचा रंग एकसारखा दिसण्यासाठी मानेलाही लावणे गरजेचे आहे.

मस्कारा -
कोणत्याही चांगल्या कंपनीचा मस्कारा लावणे कधीही चांगले. चांगल्या ब्रॅंडच्या मस्कारामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. मस्कारा लावताना पहिल्यांदा डोळ्याच्या वरील भागाला आणि नंतर खालील पापण्यांना लावावा. हे लावत असताना मस्काऱ्याचा ब्रश बाहेर गोलाकार फिरवावा. जेणेकरुन, पापण्या उठून दिसतील. गरजेप्रमाणे त्यावर अजून एक कोट द्या. सर्वच मुली काजळ किंवा आयलाइनर वापरत नाहीत. त्यामुळे मस्कारा हा सर्वांसाठीच एक चांगला पर्याय आहे.

लिपस्टिक -
कोणत्याही रंगाची लिपस्टिक तुम्ही निवडू शकता. तुमच्या स्किन टोनप्रमाणे आणि रोजच्या मेकअपसाठी पिंक, पिच, ब्राऊन किंवा न्यूड रंग निवडा. मेकअप हलका करण्यासाठी लिपस्टिक गडद न लावता थोडी लावावी आणि बोटांनी एकसारखी करुन घ्या. लिपस्टिकच्या साहाय्याने चिकबोन्सही हायलाइट करता येतील.

loading image