माय फॅशन : ‘स्वतःच ट्रेंड्स तयार करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Isha Koppikar

माझा नेहमीच भारतीय पोशाख खूप आवडतात. कारण, मला त्या पोशाखामध्ये खूप कम्फर्टेबलनेस आणि आत्मविश्वास वाटतो.

माय फॅशन : ‘स्वतःच ट्रेंड्स तयार करा’

- ईशा कोप्पीकर

माझा नेहमीच भारतीय पोशाख खूप आवडतात. कारण, मला त्या पोशाखामध्ये खूप कम्फर्टेबलनेस आणि आत्मविश्वास वाटतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी घातलेला पोशाख मला जोपर्यंत कम्फर्टेबल वाटत नाही, तोपर्यंत मी तो कॅरी करू शकणार नाही.

फॅशन करताना, साडी नेसताना किंवा ड्रेस कॅरी करताना मुख्य म्हणजे ते तुमच्यासाठी योग्य आहे का आणि तुम्ही तो आत्मविश्वासानं परिधान करू शकता का हे पाहणे गरजेचे आहे. जर ड्रेस किंवा साडी नेसल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर ते सोडून द्या, तुम्हाला जे आवडते तेच ड्रेस परिधान करा.

माझा फॅशन फंडा- जो मी फॉलो करते आणि लोकांना ते करायला सुचवते तो म्हणजे तुमची स्वतःची स्टाइल आणि कम्फर्टनेस फॉलो करा. तुमच्या स्वतःच्या स्टाइलचा ट्रेंड बनवा, फॅन्सी व्हा, क्लासी व्हा.

माझ्या मते, आपण आपल्या त्वचेच्या रंगानुसार आपल्या कपड्यांचे रंग निवडले पाहिजेत. कारण, त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्त्व खुलत असते. आपण आपल्या शरीराच्या रंगाच्या अगदी विरुद्ध किंवा वेगळ्या रंगांच्या कपडयांची निवड केली, तर कदाचित त्यात आपल्याला कम्फर्टेबलनेस वाटणार नाही.

मला वाटते, की एक फॅशन आयकॉन म्हणून मी या यादीत स्वतःचाच विचार करीन. कारण दररोज फॅशनच्या नवीन कल्पनांचा प्रयत्न करणे आणि अनुभवणे मला सुधारण्यास आणि फॅशन आयकॉन बनण्यास मदत करते.

फॅशन टिप्स

  • तुम्ही जे काही कपडे घालता, त्याबद्दल आत्मविश्वास बाळगा.

  • ट्रेंडिंग फॅशनचा अवलंब करायचा असेल, तर अद्वितीय म्हणजे दुसरे कुणी अवलंब करणार नाही असे नमुने निवडा. त्यामुळे तुमची वाटचाल काळाबरोबर असेल.

  • कपड्यांसह विविध गोष्टी एक्स्प्लोअर करण्याचा प्रयत्न करा.

  • प्रत्येक वेळी कपड्यांची रंगसंगती करायला पाहिजेच असे नाही. कधी कधी कॉन्ट्रास्ट रंग अधिक उत्कृष्ट आणि फॅन्सी दिसतात. त्यामुळे अशा प्रकारचे कपडेही घाला.

  • इतरांच्या फॅशन स्टाइल फॉलो करतानाच तुम्ही तुमची स्वतःची फॅशन स्टाइल शोधा. त्याचे अनुकरण दुसऱ्यांनी केले पाहिजे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Web Title: Isha Koppikar Writes My Fashion Self Trends

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top