किचन + : फ्लिप मॅशर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

भाज्या मॅश करणे ही प्रत्येक स्वयंपाक घराची मोठी गरज. त्यात आजकाल पावभाजीसारखा पदार्थ घरीच केला जातो. आपल्याला हव्या त्याच आणि ताज्या भाज्या, घरच्यांना व विशेषतः लहान मुलांना मानवतील असे मसाले व ताजा ब्रेड या गोष्टी साध्य होत असल्याने पावभाजी घरीच बनवण्याकडे अनेकांचा कल दिसतो. यातील भाजीची चव त्यातील बटाटा आणि सिमला मिरचीपासून गाजरापर्यंतच्या भाज्या कशा मॅश झाल्या आहेत, यावर अवलंबून असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उकडलेल्या भाज्या एकत्र करून त्या मॅश करण्यासाठी घरातील डाव किंवा मोठा चमचा वापरला जातो. मात्र, डावाने भाज्या नीट मॅश न झाल्यास त्या दाताखाली येतात आणि मसाले नीट एकत्र न झाल्याने चवही बिघडते. त्यासाठी बाजारात मिळणारा फ्लिप मॅशर खूपच उपयोगी ठरतो. भाज्या एकत्र व नीट मॅश होत असल्याने मसाले व्यवस्थित एकत्र होतात व भाजीची चव परफेक्ट होते. कष्ट कमी लागतात व कामही वेगाने होते.

असा आहे फ्लिप मॅशर

  • दणकट मॅशर हेड.
  • त्यामुळे भाज्या वेगाने व कमी कष्टात मॅश करणे शक्य. 
  • दणकट व घट्ट पकड देणार हॅंडल.
  • स्टेनलेस स्टीलची बॉडी.
  • स्वच्छ करण्यास सोपे व किचन ट्रॉलीमध्ये सहज ठेवता येते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kitchen flip masher

Tags
टॉपिकस
Topic Tags: