किचन गॅजेट्स : मायक्रोवेव्ह स्टीम क्लीनर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

microwave steam cleaner

स्वयंपाकघरातील मायक्रोवेव्ह ओव्हन हे गृहिणींच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे उपकरण आहे.

किचन गॅजेट्स : मायक्रोवेव्ह स्टीम क्लीनर

स्वयंपाकघरातील मायक्रोवेव्ह ओव्हन हे गृहिणींच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे उपकरण आहे. कुकिंगपासून ते बेकिंगपर्यंतचे विविध पदार्थ यात करता येतात. परंतु, नवीन पदार्थ केल्यांनतर किंवा उपलब्ध पदार्थ गरम केल्यांनतर मायक्रोवेव्हला पदार्थांचा वास लागतो. शिवाय त्याची व्यवस्थित स्वच्छता न झाल्यास अन्नाचे कण त्यात अडकून ते खराब होतात आणि मायक्रोवेव्हची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच तुमचा मायक्रोवेव्ह ओव्हन नियमितपणे स्वच्छ करणे हे तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. नेहमीच्या पद्धतीने मायक्रोवेव्ह ओव्हन स्वच्छ करण्यासाठी एखाद्या भांड्यात लिंबू किंवा व्हिनेगर टाकलेले पाणी वापरले जाते, किंवा एखाद्या क्लिनिंग सोल्युशनच्या मदतीने ते स्वच्छ करावे लागते. परंतु हल्ली बाजारात मायक्रोवेव्हची बारकाईने, पद्धतशीरपणे स्वच्छता करण्यासाठी विविध प्रकारचे मायक्रोवेव्ह क्लिनर उपलब्ध आहेत.

स्टीम क्लीनरची वैशिष्ट्ये

  • हा मायक्रोवेव्ह स्टीम क्लीनर दोन भागांमध्ये विभागलेला आहे. खालचा भाग मोठा, तर त्याचा वरचा म्हणजेच झाकणाचा भाग लहान असतो. त्या झाकणाला छिद्रे असतात. क्लीनरच्या खालच्या भागात क्लीनिंग सोल्युशन टाकावे किंवा पाणी टाकून त्यात व्हिनेगर, लिंबू यांचे मिश्रण टाकावे. त्यात नोंदवलेल्या प्रमाणानुसारच पाण्याची पातळी ठेवावी. त्यांनतर, त्याचा वरचा भाग म्हणजे त्याचे झाकण लावावे.

  • पुढच्या टप्प्यात उच्च तापमानावर ५ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. पाण्याला जसजशी उकळी येईल तसा चिकट थर विरघळायला सुरुवात होईल आणि थोड्या वेळानंतर, मऊ कपड्याच्या मदतीने चिकट थर पुसून घ्यावा म्हणजे मायक्रोवेव्ह स्वच्छ होईल.

  • या क्लीनरचे आवरण जाड असल्याने बाहेरून जास्त गरम होत नाही आणि हा सहजपणे हाताळता येतो. शिवाय स्वच्छ करणेही सोपे होते.

  • एरवी, वाटीत किंवा एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवल्यास पाण्याला उकळी आल्यावर पाणी सांडण्याची भीती असते. तसेच ते भांडे पुन्हा बाहेर काढताना हाताला चटकेही बसू शकता. म्हणून मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्यासाठी मायक्रोवेव्ह स्टीम क्लिनरचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.

Web Title: Kitchen Gadgets Writes Microwave Steam Cleaner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenWomens Corner
go to top