किचन गॅजेट्स : वॉशिंग बाऊल अँड स्टेनर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

washing bowl and strainer
किचन गॅजेट्स : वॉशिंग बाऊल अँड स्टेनर

किचन गॅजेट्स : वॉशिंग बाऊल अँड स्टेनर

अनेकदा तांदूळ, भाज्या, फळं धुतल्यानंतर ते पाणी निथळण्यासाठी आपण जेव्हा भांडं तिरकं करतो, तेव्हा त्याबरोबर तांदळाचे किंवा इतर धान्याचे कणही वाहून जातात. फळं खाली सिंकमध्ये पडतात, भाज्यांच्या काड्याही खाली पडतात आणि चिडचिड होते. त्यावर उपाय आहे वॉशिंग बाऊल अँड स्टेनरचा. अगदी सोप्या पद्धतीची रचना वापरल्यानं यात अनेक कामं सोपी होतात. या बाऊलमध्ये नेहमीच्या बाऊलप्रमाणे फळं, तांदूळ किंवा इतर गोष्टी धुवायच्या आणि तो बाऊल तिरका करायचा. या बाऊलमध्ये एका बाजूला छिद्रं असतात. त्यामुळे बाऊल तिरका केल्यावर या छिद्रांमधून पाणी बाहेर जातं आणि आतल्या गोष्टी तशाच राहतात. शिवाय ही निथळण्यासाठीची बाजू मुद्दाम पसरट आणि विशिष्ट आकाराची बनवलेली असते. त्यामुळे बाऊल तिरका करूनही फार त्रेधातिरपीट न उडता पाणी व्यवस्थित ड्रेन होतं. ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग साइट्सवर हा आणि अशा प्रकारचे इतर बाऊल मिळतात. कही बाऊल्समध्ये आणखीही वेगळ्या कल्पना लढवलेल्या असतात.

वॉशिंग बाऊल अँड स्टेनरची वैशिष्ट्यं...

  • नेहमीच्या बाऊलसारखा असल्यानं टिकायला चांगला.

  • पाणी वाहून जाण्यासाठीची छिद्रं उभ्या बाजूला असल्यानं धुताना सगळं पाणी बाहेर जात नाही.

  • छिद्रं असलेली बाजू उंचीला जास्त असल्याने बाऊल तिरका केला, तरी पाण्याबरोबर फळं किंवा तांदळाचे कण वाहून जात नाहीत.

  • बाऊलचा आकार किचनसाठी परफेक्ट असतो आणि इतर वेळी फळं, भाज्या ठेवण्यासाठी तो स्टोअरेज म्हणूनही तो वापरता येतो.

  • तांदूळ, डाळी, कडधान्यं, पास्ता, फळं, भाज्या अशा अनेक गोष्टींसाठी बाऊलचा वापर करता येतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenWomens Corner
loading image
go to top