किचन + : मिनी केक पॉप मेकर

Mini-Cake-maker
Mini-Cake-maker

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात सर्वाधिक ट्राय केलेला पदार्थ आहे केक! घरच्या घरी यम्मी केक बनविण्याचे सुख काही औरच. घरातच केकचं बॅटर बनवून ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये केक बनवण्याचं कसब या काळात अनेक गृहिणींनी (होय, पुरुषांनीही!) आत्मसात केलं आहे. अशा प्रकारचे केक बनविण्यासाठी लागणारा वेळ व मेहनतही खूप जास्त असते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्‍त्यासाठी झटपट मिनी केक बनवायच्या असल्यास त्यासाठीचा इलेक्ट्रिक मिनी केक पॉप मेकर हा अत्यंत चांगला पर्याय आहे.

घरच्या घरी बॅटर बनवून तुम्ही हव्या त्या वेळी केक बनवू शकता. यामध्ये तुम्ही एका कुटुंबाचा भरपेट नाश्‍ता होईल असे केक कमी वेळेत बनवून त्याचा आनंद लुटू शकता.

वैशिष्ट्ये -
1) नॉनस्टिक बेकिंक प्टेटची सोय.
2) एकावेळी नऊ पॉप केक बनवता येतात.
3) पॉवर लाइट व केक बेक झाल्याचा सिग्नल.
4) पॉप मेकरला लॉकिंग हॅंडलची सोय.
5) रबराच्या नॉनस्टिक पायांमुळे पॉप मेकर किचन प्लॅटफॉर्मवर घट्ट बसतो.
6) पॉप मेकरची वायर त्याला गुंडाळून ठेवण्याची व्यवस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com