पहिल्यांदा बचत गट सुरु करताय? जाणून घ्या प्रक्रिया

बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणचं बनलंय.
Bachat gat
Bachat gatesakal
Updated on
Summary

बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणचं बनलंय.

आज प्रत्येकालाच बचत गट (Bachat gat) म्हणजे काय हे माहितेय. ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असे म्हणायला हरकत नाही. बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे, परंतु बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणचं बनलंय. बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिलेली आहे.

Bachat gat
बचत गट, बेरोजगारांना दिलासा !

सध्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात अनेक छोटे मोठे बचत गट कार्यरत आहेत. ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा मोठा हात आहे. बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे. प्रारंभी स्वतःच्या बचतीला प्राधान्य देत त्यांनी स्वतःची पत निर्माण केली. सामूहिक उद्योगातून उत्पादन सुरू केले. त्यातून उद्योजकतेचा विश्वास मिळताच अनेक महिलांनी बचत गटांतून कर्ज घेऊन स्वतःचे स्वतंत्र व्यवसाय आणि आपले अस्तित्व निर्माण केले.

यावेळी जर तुम्हाला पहिल्यांदा बचत गटाची सुरवात करायची असेल तर तो गट कसा तयार करायचा, त्याची सुरवात कशी करायची, त्याचा पाया कसा मजबूत करायचा, गटाची रचना कशी आहे, त्यातून कोणते व्यवसाय (Business)करता येईल, त्यातून फायदे कसे मिळतील, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Bachat gat
सक्सेस स्टोरी: अबब ! गोकुळमध्ये तब्बल १५२ सदस्यीय शेतकरी बचत गट

- बचत गट स्थापन कसा करावा

बचत गट स्थापन करण्यासाठी गरज असते विश्वास आणि सहकार्याची. बचतगट स्थापन करण्यासाठी समूहाचे पैसे गुंतवले जातात, गटातील लोकांचे प्रयत्न आणि प्रयत्नांचीही खूप अपेक्षा असते, त्यामुळे हे त्यांचे काम अगदी सुरुवातीपासूनच असावे.

-किती जण मिळून गटाची सुरवात करायची

बचत गटाची सुरवात करताना दहा ते बारा जण मिळून गटाची सुरवात करु शकतात.

- बचत गटाचा पाया कसा घट्ट होतो

गटाचे नियम, अटी, रुपरेषा आणि त्यावर एकमत झाले की त्या गटाचा पाया घट्ट होऊ लागतो. यातूनच नव्या संकल्पनांवर एकमत करुन व्यवसायाला सुरवात करता येते.

Bachat gat
बचत गट साकारणार नूलमध्ये पोषणबाग

- बचत गटामध्ये कोणते व्यवसाय करता येतील

लोणचं-पापड, सॅनिटरी नॅपकीन, ज्वेलरी मेकिंग, गारमेंट, शेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशा विविध प्रकारच्या व्यवसायाची सुरवात करता येते.

बचत गटाची रचना...

- एकाच गावातील किंवा वस्तीतील काही महिलांनी एकत्र येवून बचत गटाची संकल्पना समजून घेणे

- बचत गटात शिक्षणाची कोणतीही अट नाही.

- महिला सभासदांची संख्या कमीतकमी सात ते आठ असावी. जास्त सभासद असल्यास अधिक चांगले.

- बचत गटाच्या महिलांनी मिटिंगसाठी कोठे एकत्र भेटायचे ते ठिकाण ठरवावे.

- सर्व संमतीने बचत गटाचे नाव ठरवावे.

- दर महिन्याला किती रक्कम जमा करावयाची हे ठरवावे.

- बचत गटाची नियमावली ठरवावी.

Bachat gat
आर्थिक साक्षरतेअभावी महिला बचत गट सदस्यांची परवड 

बचत गटामुळे होणारे फायदे...

- समविचारी महिला एकत्र आल्यामुळे महिलांच्या कला व गुणांना वाव मिळत आहे.

- महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे.

- महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे.

- महिलांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे.

- महिलांना राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्‍यवहाराची माहिती मिळत आहे.

- बचत गटामुळे महिला लघुउद्योग व स्वयंरोजगार करून सक्षम होत आहेत.

- स्‍त्री दृष्‍टीकोनाबाबत पुरूषांच्‍या मानसिकेतत बदल होत आहे. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील दर्जा वाढत आहे.

- बचत गटामुळे महिलांचे उद्योग वा व्यवसायातून आर्थिक सशक्तीकरण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com