ॲप : ब्यूटी प्रॉडक्‍ट्स शोधताय...?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

का हवं मोबाईलमध्ये? 
1) ब्रॅंडेड कॉस्मॅटिक, ब्यूटी प्रॉडक्ट्स
2) गरजांनुसार प्रॉडक्‍ट निवडण्याची सुविधा 
3) तज्ज्ञांचा सल्ला, व्हिडिओ ट्युटोरियल्स 
अशा शॉपिंगसाठी तुम्ही ॲप वापरले आहे का? कोणते वापरले, आम्हाला जरूर कळवा. maitrin@esakal.com वर. तुमचा अनुभव अन्य यूझर्सना नक्की उपयोगी पडेल.

मैत्रिणींच्या मोबाईलमध्ये हवीत, अशी ॲप्स आम्ही दर आठवड्याला सुचविणार आहोत. शॉपिंगपासून वेलनेसपर्यंत आणि ग्रुमिंगपासून पॅरेंटिंगपर्यंत सर्वच ॲप्सचा यामध्ये समावेश असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हटके कॉस्मॅटिक किंवा ब्यूटी प्रॉडक्‍ट्स‌ची शॉपिंग करायचीय...तीही घरबसल्या...ऑनलाइन... 

जाहिरातीतून रोज आदळणाऱ्या ॲपवरची प्रॉडक्‍ट्स सगळीकडं दिसताहेत...मग काय करायचं...?  ब्रॅंडेड शॉपिंगसाठी Nykaa ॲप चांगला पर्याय आहे. अस्सल देशी बनावटीचं ॲप आणि त्यावर आहेत जगभरातले ब्रॅंडस्‌. शब्दशः सांगायचं तर ‘ए टू झेड’ ब्रॅंड्स‌ इथं उपलब्ध आहेत. सोबत त्यावरच्या ऑफर्सदेखील. वेबसाइट आणि ॲप फक्त कॉस्मेटिक आणि ब्यूटी प्रॉडक्‍ट्स‌साठी असल्यामुळं अन्यत्र लक्ष जाण्याची शक्‍यता नाही. ब्यूटी प्रॉडक्‍टचे अगदी अचूक पर्याय या ॲपवर उपलब्ध आहेत. 

समजा तुम्हाला अचूक पर्याय हवे आहेत. उदाहरणार्थ- स्किन ड्राय आहे किंवा पिगमेंटेशनवर उपाय शोधताय, तर Shop By Concern असा पर्याय तुम्हाला मिळेल.  
यूझरच्या गरजांनुसार कस्टमाइज्ड ॲप हा नवा प्रकार नाही. मात्र, यूझरला वाटणारी काळजी लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनं उपलब्ध करून देण्यात नावीन्य जरूर आहे. एखाद्या मोठ्या मॉलमध्ये आपल्याला हव्या त्या स्टोअरमधल्या हव्या त्या ट्रेपर्यंत पोचून प्रॉडक्‍ट घेतोय, असा आनंद ॲपवर मिळतो. 

Nykaa चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओ ट्युटोरिअल्स. एखादं प्रॉडक्‍ट कसं वापरायचं, त्याचे परिणाम काय याबद्दलचे हे व्हिडिओ आहेत. तज्ज्ञांचा सल्लाही व्हिडिओ फॉर्ममध्ये ॲपवर पाहता येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looking for Beauty Products