किचन + : नारळ झटपट खोवण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

पदार्थांमध्ये नारळाचा मुबलक वापर ही खरेतर कोकणवासीयांची खासियत. त्यांना भाजीपासून वरणापर्यंत आणि प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये नारळ हा हवाच. मात्र, हल्ली सगळीकडेच केक, खीर व इतरही काही इनस्टंट पदार्थांवर नारळ खोवून टाकला जातो. अर्थात, सवय नसल्यास नारळ खोवण्याचे काम अत्यंत अवघड व जोखमीचे. अर्धा फोडलेला नारळ विळीच्या पुढील भागावरील दातऱ्यांवर धरून जोर लावून खोवण्यासाठी व एकसमान चव पाडण्यासाठी सराव व नैपूण्य गरजेचे.

पदार्थांमध्ये नारळाचा मुबलक वापर ही खरेतर कोकणवासीयांची खासियत. त्यांना भाजीपासून वरणापर्यंत आणि प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये नारळ हा हवाच. मात्र, हल्ली सगळीकडेच केक, खीर व इतरही काही इनस्टंट पदार्थांवर नारळ खोवून टाकला जातो. अर्थात, सवय नसल्यास नारळ खोवण्याचे काम अत्यंत अवघड व जोखमीचे. अर्धा फोडलेला नारळ विळीच्या पुढील भागावरील दातऱ्यांवर धरून जोर लावून खोवण्यासाठी व एकसमान चव पाडण्यासाठी सराव व नैपूण्य गरजेचे. त्यात थेट विळीवर हात दाबावा लागत असल्याने अपघाताचा धोकाही असतोच. त्यामुळे विळीचा उपयोग न करता नारळ खोवता आल्यास ते नक्कीच सोयीचे. त्यासाठी बाजारात स्टेनलेस स्टीलचे हॅंडलच्या मदतीने ब्लेड फिरवून नारळ खोवण्याची यंत्रे उपलब्ध आहेत. वेगाने नारळ खोवता येण्याबरोबरच धोका कमी असल्याने घाईच्या वेळी ही यंत्रे गृहिणींच्या उपयोगाची ठरतात.

वैशिष्ट्ये -

  • सहज फिरवता येणारे ब्लेड.
  • यंत्राच्या खाली असलेल्या लॉकच्या मदतीने किचन ओट्यावर घट्ट बसवता येतो.
  • त्यामुळे जोर देऊन हॅंडल फिरवले, तरी यंत्र हलत नाही व त्यामुळे इजा होण्याचा धोका नाही. 
  • पूर्ण स्टेनलेस स्टीलची बॉडी.
  • ब्लेड व हॅंडल वेगळे करून सहज साफ करता येते. 
  • पुन्हा अगदी सहज जागेवर बसवता येते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To lose coconut instantly

Tags
टॉपिकस
Topic Tags: