esakal | मेकअप-बिकअप : सणासुदीसाठी अशी घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

मेकअप-बिकअप : सणासुदीसाठी अशी घ्या काळजी

मेकअप-बिकअप : सणासुदीसाठी अशी घ्या काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोणत्या समारंभासाठी मेकअप करायचा आहे, त्यावर त्याचे स्वरूप अवलंबून आहे. त्यामुळे तो लक्षात घेऊन मेकअप हलका पाहिजे की उठावदार हे ठरवा.

  • मेकअप करताना त्या समारंभाची वेळ कोणती आहे तेही लक्षात घ्या.

  • मेकअपचा अर्थातच पेहरावाशीही संबंध असतो. उदाहरणार्थ, पिवळी-पांढरी साडी नेसली असेल तर त्यावर लाल लिपस्टिक लावलेली विसंगत दिसते.

  • मेकअप किट या काळात तयार ठेवावे, वस्त्रे परिधान करण्यापूर्वीच मेकअप करणे केव्हाही चांगले.

  • मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतलेला असावा, त्यासाठी चांगला फेसवॉश वापरावा.

  • तेलकट त्वचा असल्यास प्रथम ऍस्ट्रिजेंट लावावे.

  • ड्राय त्वचेसाठी मॉइश्‍चरायजर लावावे.

  • फाउंडेशन चांगल्या कंपनीचाच वापरावा.

  • फाउंडेशन लावल्यावर पावडरचा हलका पफ फिरवावा, त्यानंतर डोळ्यांचा मेकअप करावा.

  • विविध रंगांच्या आय लायनरमधून तुम्हाला व पोशाखाला शोभणाऱ्या रंगांची निवड करावी.

  • बरेचदा मेकअप करताना लिक्विड फाऊंडेशनचा एकच थर चेहऱ्यावर लावला जातो. तो अर्ध्यापाऊण तासात कमी होतो. नंतर चेहरा मेकअप न केल्यासारखा दिसू लागतो. त्यामुळे दिवसभर बाहेर राहणाऱ्यांनी फाऊंडेशनचे दोन-तीन थर चेहऱ्यावर लावायला हवेत. त्यावर कॉम्पॅक्‍ट पावडर लावल्यास दिवसभर मेकअप चांगला राहतो.

loading image
go to top