ग्रुमिंग + : मेकअपसाठीचे 'मस्ट' ब्रश!

Makeup-Brush
Makeup-Brush

मेकअप करणे ही एक कला आहे. चित्र रेखाटणे हीदेखील एक कलाच आहे आणि त्यासाठी ब्रश अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे मेकअप करण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणजे ‘मेकअप ब्रश’. फेस मेकअप, आय मेकअप आणि लिपस्टिकसाठीही वेगवेगळे ब्रश असतात. पण, आपल्या रोजच्या वापराकरीता आणि बेसिक मेकअपसाठी मोजके ब्रश असणे आवश्यक आहे. जाणून घ्या, कोणते मेकअप ब्रश तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फाउंडेशन ब्रश
फाउंडेशनने चेहऱ्यावर मेकअपचा बेस तयार करावा लागतो. बेस पक्का आणि चांगला असल्यास मेकअप सर्वाधिक टिकतो. त्यासाठी फाऊंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर एकसारखे लावणे गरजेचे असते. त्यासाठी ‘फाउंडेशन ब्रश’ वापरावा. हा ब्रश गोलाकार, मोठा आणि मऊ असतो. त्यामुळे फाउंडेशन योग्य प्रमाणात सर्वत्र पसरले जाईल.

पावडर ब्रश
फाउंडेशननंवर आपण लुज पावडर लावतो. ती ब्रश पावडर ब्रशमध्ये जास्त प्रमाणात न येता लावण्यासाठी ‘पावडर ब्रश’ वापरला जातो. हलक्या पद्धतीने ही सैल पावडर एकसारखी चेहऱ्यावर वितरित करण्यासाठी लांब, मऊ आणि मऊ ब्रिस्टल्स ब्रशमध्ये असतात. फाउंडेशन ब्रशप्रमाणेच हा देखील गोल, मात्र काहीसा चपटा असतो. जेणेकरून आपण हळूवारपणे पावडर लावू शकता. या ब्रशचा वापर ब्लश ब्रश तसेच ब्रॉन्झर ब्रश म्हणूनही करता येऊ शकतो.

फ्लॅट आयशॅडो ब्रश
चेहऱ्याच्या मेकअप प्रमाणेच महत्त्वाचा आहे तो ‘आयमेकअप’. त्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. हे आयशॅडो डोळ्यांवर लावण्याकरिता खास फ्लॅट आयशॅडो ब्रशचा वापर करावा. त्यामुळे, कोणत्याही रंगाचे आयशॅडो लावण्यासाठी या ब्रशचा वापर करावा.

'ब्लेंडिंग’ ब्रश
मेकअप करताना तो फक्त चेहऱ्यावर लावून चालत नाही, तर त्याला योग्य पद्धतीने ‘ब्लेंड’ अर्थात एकजीव, एकसारखे करणेही आवश्यक असते. आयशॅडो लावल्यावर हळूवार पद्धतीने एकसारखे पसरवण्यासाठी ‘ब्लेंडिंग’ ब्रश वापरा. आतूनबाहेर अशा दिशेने फिरवल्याने आयशॅडो एकसमान लागते.

ॲंगल्ड ब्रश
चेहऱ्यारील काही भाग हायलाइट केल्यास आपला चेहरा अधिक उठून दिसतो. कोन असलेला ॲंगल्ड ब्रश शेडिंगसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ब्लश, ब्रॉन्झर आणि हाइलाइटर लावण्यासाठी सॉफ्ट, फ्लफी एंगल ब्रशेस उत्कृष्ट आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com