esakal | ग्रुमिंग + : नेल आर्टसाठी ‘ड्रायर’
sakal

बोलून बातमी शोधा

nail-art-dryer

नेल ड्रायरबद्दल आणखी...

  • नेल ड्रायर एलईडी लाइट्ससोबत अतिनील किरणांचा वापर करते. मात्र, ते सूर्याच्या अतिनील किरणांपेक्षा कमी क्षमतेचे असल्याने सुरक्षित आहे.
  • नेल ड्राय वेगानं होत असल्यामुळं नेल आर्टनंतर लेअर्स खराब होत नाहीत.
  • नेल आर्ट ३० सेकंदांमध्ये ड्राय होऊ शकते. नेल ड्रायरचा तेवढा वापर पुरेसा आहे.
  • ‘स्किन कॅन्सर फाउंडेशन’च्या मते एलईडी नेल लेप वापरण्यासाठी सुरक्षित आहेत, त्यामुळं त्यांचा वापर योग्य आहे.
  • अतिनील किरणांबद्दल मनात शंका असल्यास अँटी युव्ही ग्लोव्हजचा वापर करू शकता.

ग्रुमिंग + : नेल आर्टसाठी ‘ड्रायर’

sakal_logo
By
संदेश मुळीक

नेल आर्ट किंवा नेल पेंट वापरलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो, तो ते सुकण्यासाठी लागणारा वेळ. कधी कधी काही पेंट आणि पॉलिश इतके सेन्सिटिव्ह असतात, की लावल्यानंतर काही क्षणात पसरतात आणि पूर्ण नेल आर्ट खराब होतं. पर्यायानं इतका वेळ केलेली मेहनत नेल रिमूव्हरनं साफ करून वाया घालवावी लागते. आता काळजी करू नका, या समस्येचा तोडगा निघाला असून, तो आहे ‘नेल ड्रायर’. यामुळं नेल आर्ट झाल्यावर आपण लगेचच ते ड्राय करू शकतो. ड्रायरमुळं लेयर्स नीट राहतात आणि गडबडीच्या वेळीही आपण व्यवस्थित नेल पॉलिश करू शकतो.

loading image
go to top