esakal | Video: टू सोलो सोल्स...
sakal

बोलून बातमी शोधा

Video:  टू सोलो सोल्स...

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

Video: टू सोलो सोल्स...

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

सोलो ट्रॅव्हलर

नाव - साक्षी रामपाल
शहर - नवी दिल्ली
काम - मल्टिनॅशनल कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत एका ट्रीपला एकत्रित गेला आहात आणि तुमचे मित्र ट्रीपनंतर तुम्हाला तिथेच एकटीला सोडून घरी परतले. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपली सोलो ट्रॅव्हलर, साक्षी. सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी ती मैक्लोडगंज इथे तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्या वेळी तिला स्थानिकांकडून ‘ट्राएंड ट्रेक’विषयी माहिती मिळाली. तिला हा ट्रेक करायचा होता; पण तिच्या मित्रांना  यामध्ये काही रस नव्हता. त्यांनी तिला परत येण्याचा खूप आग्रह धरला; परंतु साक्षीचा निर्धार पक्का होता. अखेरीस, ते तिला तिथेच सोडून परतले. साक्षीने स्थानिकांच्या मदतीने हा ट्रेक उत्तमरीत्या पूर्ण केला. ती सांगते, ‘मी एकटी आहे म्हणून घाबरले नाही. संपूर्ण रात्र चहाच्या टपरीमध्ये एकटीने घालवली. पहाडी लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले.’

या आकस्मिक घटनेनंतर सुरू झाला साक्षीचा ‘सोलो ट्रॅव्हलिंग’चा प्रवास. ती सांगते, ‘मी एकटीने प्रवास करू शकते. तर मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्यादेखील एकटीने उत्तमरीत्या पार पाडू शकते, हा आत्मविश्वास या घटनेमुळे आला.’ साक्षीने आजवर भारतातील १५६ ठिकाणे, ४८ शहरे व १ देश असा सुमारे ७ हजार ४७८ किलोमीटरचा प्रवास एकटीने केला आहे. ती म्हणते, ‘रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुटका करून घ्यायची असल्यास मी प्रवास करते, मला एखादी गोष्ट साजरी करायची असते तेव्हाही मी प्रवास करते. मला काहीतरी किंवा कोणालातरी विसरायचे असते तेव्हादेखील मी प्रवास करते. ’ यावरून समजलेच असेल, की, साक्षीला प्रवासाची किती आवड आहे.  साक्षीने सोलो ट्रॅव्हल्ससाठी सोशल माध्यमांद्वारे ग्रुप तयार केले आहेत. ज्याद्वारे ती एकट्या प्रवाशांना मार्गदर्शन करते. अनेक परदेशी सोलो ट्रॅव्हलर्सना भारतातील त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी ती मदत करते. तिची लहान बहीणदेखील तिच्याचप्रमाणे सोलो ट्रॅव्हलिंग करते. दोघींचे फेसबुक, इनस्टाग्रामवर ‘टू सोलो सोल्स’ या नावाने पेज आहे, तसेच याच नावाने यू-ट्यूब चॅनेलदेखील आहे.

loading image
go to top