माय फॅशन : कम्फर्टला द्या प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shayantini ghosh

मी कुठलाही फॅशन ट्रेंड अंधपणानं फॉलो नाही करत. मला वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात.

माय फॅशन : कम्फर्टला द्या प्राधान्य

- शायंतिनी घोष

मी कुठलाही फॅशन ट्रेंड अंधपणानं फॉलो नाही करत. मला वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात. ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत मी सिमसिमची भूमिका साकारतेय, त्यासाठी माझा एकच वेस्टर्न आऊटफिट आहे ज्यात प्रेक्षक रोज मला बघतात; पण मला ट्रॅडिशनल कपडे, जास्त करून साडी नेसायला खूप आवडते. मी कुठलीही फॅशन फॉलो करताना माझ्या कम्फर्टला जास्त प्राधान्य देते. फॅशन ट्रेंड फॉलो करण्यासाठी अवघडून राहणं मला पटत नाही. मला साडी नेसायला प्रचंड आवडतं. मी २४ तास साडीमध्ये वावरू शकते. मी कधी कधी विचार करते, की ज्या काळात बायका फक्त साडी नेसायच्या त्या काळात मला जगायला आवडेल. साडी नेसताना मी एका गोष्टीची काळजी घेते ते म्हणजे आपण कुठल्या ओकेजनसाठी जातोय. लग्न समारंभासारखा मोठा प्रसंग असेल, तर आपण साडीसोबत खूप दागिने घालू शकतो; पण छोट्या समारंभासाठी जात असू, तर मी ओव्हरड्रेस्ड नाही वाटणार, याची काळजी घेते. माझ्या सोशल मीडियावर खूप फोटोज असे पाहायला मिळतील, ज्यात मी साडीसोबत स्नीकर्स घातले आहेत. साडी हा पारंपरिक पोशाख असला, तरी तो आजच्या मॉडर्न काळात एका वेगळ्या पद्धतीनं परिधान केला जाऊ शकतो आणि तितकाच सुंदरदेखील वाटू शकतो.

माझा फॅशन फंडा आहे, ‘कम्फर्ट ओव्हर फॅशन.’ जर तुम्ही कम्फर्टेबल कपडे घातले, तर तुम्ही अजून कॉन्फिडन्ट आणि सुंदर दिसता. मला सर्वांत जास्त काळा आणि पांढरा हे दोनच रंग आवडतात. त्यामुळे मी रंगांची निवड करताना जास्त विचार करत नाही. सणासुदीला मी मला ज्या रंगाचे आऊटफिट आवडतात ते घालते. तेव्हा मी रंगाचा इतका विचार नाही करत. ‘अलीबाबा दास्तान-ए-काबूल’मध्ये सिमसिमच्या भूमिकेत प्रेक्षक मला रोज निळ्या रंगाच्या आटफिटमध्ये पाहतात आणि त्यासाठी मला खूप कॉम्प्लिमेंट्सदेखील मिळतात; पण खऱ्या आयुष्यात काळा आणि पांढरा या दोन रंगांना मी जास्त प्राधान्य देते. माझा कोणी एक फॅशन आयकॉन नाही आहे. मी वेगवेगळ्या फॅशन ट्रेंडसाठी वेगवेगळ्या लोकांना फॉलो करते. पाश्चिमात्य लोकांना कॅज्युअल लूकसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, ते त्यांना उपजत असतं आणि ही गोष्ट मला खूप आवडते. मी माझ्या कॅज्युअल लूकसाठी त्यांना फॉलो करते. 

फॅशन टिप्स

  • तुमच्या पर्सनॅलिटीला अनुसरून कपडे घाला आणि तुमची खरी ओळख जपून ठेवा. फॅशनसाठी उगीचंच जे तुम्ही नाही आहेत ते बनू नका

  • कॉन्फिडन्ट राहा. जर तुम्ही कॉन्फिडन्ट असाल, तर तुम्ही आपोआप सुंदर दिसता.

  • आपण कुठल्या प्रसंगासाठी जातोय, बाहेर तापमान काय आहे, दिवस आहे की रात्र, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कपडे परिधान करा.

  • कम्फर्टेबल कपडे घाला. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर तुम्हाला वावरणं सोपं जातं.

  • अॅक्सेसरीज घालताना लक्ष द्या, की तुम्ही ओव्हरड्रेस्ड तर नाही होत आहात. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)