आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता वाचा सविस्तर...

शिल्पा परांडेकर 
Saturday, 30 May 2020

‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’.

नाव - अश्विनी भावसार शाह 
गाव - ठाणे 
व्यवसाय - कॉर्पोरेट गिफ्टिंग 
वय - ३१ वर्षे 

ती स्वच्छंदी, आनंदी, मनमोकळी. आम्ही केवळ फेसबुक मैत्रीणी. तिच्या आणि तिच्या आगळ्यावेगळ्या कामाची ओळखही फेसबुकच्या माध्यमातूनच झाली. मात्र प्रत्यक्ष बोलणे आज या लेखाच्या निमित्ताने झाले. तिच्या पोस्ट्समधून उलगडलेली ती तिच्या प्रत्यक्ष जीवनातही 'ऑन डिफरंट ट्रॅक' या शिर्षकप्रमाणेच थोड्या हटके मार्गावरून चालणारी आहे. ती आपली नवीन मैत्रीण अश्विनी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कॉर्पोरेट क्षेत्रात सणासुदीला किंवा एखाद्या खास प्रसंगी सहकाऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले जातात. पण बऱ्याचदा गिफ्ट निवडीबाबत संभ्रम असतो. मग अशावेळी समोर येते ते ‘गिफ्टबड्स’ हे ‘कार्पोरेट गिफ्टींग मधील नावाजेले नाव. गिफ्टबड्स, गिफ्ट निवडीबाबत संपूर्ण मार्गदर्शन करते व इच्छुक ठिकाणी उत्तम पॅकिंग करून तुमचे गिफ्ट पोचवतेही. उच्चशिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी असे सगळे व्यवस्थित सुरू असताना काही कारणाने पहिली नोकरी सोडावी लागली. पण लगेचच तिला हवी तशी नवी नोकरी मिळालीही. ‘हाच तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आणि याचे सर्व श्रेय मी माझा नवरा हर्षिल याला देते. त्याने त्याक्षणी नोकरी किंवा उद्योग यांतील मला योग्य वाटेल ते करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आधीच्या नोकरीत तो माझा वरिष्ठ असल्यामुळे व्यवहार, मार्केटिंग हे मी त्याच्याकडून शिकलेच होते. आता मला माझ्या उद्योगातही त्याच्या या कौशल्यांचा नेहमीच उपयोग होतो,’ असे अश्विनी सांगते. सुरुवातीला नवऱ्याकडून मिळालेल्या केवळ पाच हजार इतक्या कमी भांडवलात सुरु झालेला व्यवसाय पहिल्याच वर्षी सुमारे तीन लाख आणि आज तीन वर्षांनी सुमारे अठरा लाखांची उलाढाल करू शकला, कारण ‘मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क आणि प्रेझेन्टेशन’ या चार गोष्टींचा वापर आम्ही आमच्या व्यवसायात करतो. शिवाय ‘आवड असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता. फक्त स्वतःवर व स्वतःच्या कामावर विश्वास हवा,’ आणि ‘पुढे जायचे असेल तर मागचे रस्ते बंद करा, म्हणजे परत फिरण्याचा मार्गच उरत नाही,’ असे कानमंत्रही ती आवर्जून देते. केवळ आवड, मेहनत, क्रिएटव्हिटी, नेटवर्क, प्रेझेन्टेशन, आत्मविश्वास आणि किरकोळ भांडवलातही व्यवसाय सुरू करून यशस्वी होता येते, हे अश्विनीच्या उदाहरणातून समजते. 

चला तर मग, तुम्हीही तयार व्हा ‘डिफरंट ट्रॅक’वर चालण्यासाठी... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Parandekar article ashwini Bhavsar Shah Business Corporate Gifting