माय फॅशन : ‘अ‍ॅक्सेसरीजची निवड काटेकोरपणे करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shubhangi atre

मला अगदी कम्फर्टेबल आणि तरीही माझा लूक आकर्षक करणारे कपडे घालायला आवडतात. ते कोणत्या निमित्तासाठी घातले आहेत, त्यावरही अवलंबून असते.

माय फॅशन : ‘अ‍ॅक्सेसरीजची निवड काटेकोरपणे करा’

- शुभांगी अत्रे

मला अगदी कम्फर्टेबल आणि तरीही माझा लूक आकर्षक करणारे कपडे घालायला आवडतात. ते कोणत्या निमित्तासाठी घातले आहेत, त्यावरही अवलंबून असते. मला ओव्हरड्रेस्ड व्हायला आवडत नाही; पण आकर्षक आणि साधे कपडे आवडतात. सलवार कमीज आणि साडी हे माझे आवडते भारतीय कपडे आहेत. ते सततच फॅशनमध्ये असतात. त्यामुळे ते कम्फर्टेबल आणि सुंदरही असतात आणि स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात भर घालतात. माझ्या वॉर्डरोबमध्ये गेल्या अनेक वर्षांत मी देशभरात विविध ठिकाणी केलेल्या प्रवासातून गोळा केलेले साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. मी ‘अँड टीव्ही’वरील ‘भाभीजी घरपर हैं’ मालिकेमध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारते. यामध्ये माझी साड्यांची हौस पूर्ण होते आणि ‘अंगुरी भाभी’च्या लूकसाठी कलेक्शन निवडण्याचीही संधी मिळते. ही माझ्यासाठी विन-विन सिच्युएशन आहे. परंतु, मी चित्रीकरण करत नसते किंवा बाहेर जाते, तेव्हा सैल टीशर्ट, पायजमा आणि शॉर्टस् असे कपडे पसंत करते.

फॅशन ही वैयक्तिक स्टाइल स्टेटमेंट आहे. त्यामुळे आपण कपडे निवडताना एका गोष्टीवर भर दिला पाहिजे, ती म्हणजे त्यातून तुमचे व्यक्तिमत्त्व ठळक झाले पाहिजे. मग ते भारतीय कपडे असोत किंवा पाश्चिमात्त्य. तुम्हाला आरामदायी न वाटणे किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्व किंवा स्टाइलचे प्रतिबिंब न उमटणे ही एक नेहमीची चूक अनेकजण करतात. मला फार भडक कपडे आवडत नाहीत. कापड किंवा डिझाइनच्या तपशीलांनुसार आपण योग्य मेकअप किंवा अ‍ॅक्सेसरीजचीही निवड केली पाहिजे. उदाहरणार्थ, खूप एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्यांसोबत भरगच्च दागिने आणि मेकअप टाळला पाहिजे. परंतु, हलकी शिफॉनसारखी साडी परिधान करत असताना आकर्षक दागिने आणि ब्राइट लिपस्टिक यांच्यासोबत एक स्मोकी लूक एक नाट्यमय एपियरन्स देतो.

कधीकधी तुमचा मूड, सीझन आणि निमित्त या गोष्टीदेखील तुमच्या कपड्यांच्या निवडीवर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, आपण उन्हाळ्यात जास्त हलकेफुलके कपडे घालणे पसंत करतो; पण तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार किंवा तुमच्या आवडी किंवा लूक्स यांच्यानुसार उजळ किंवा पेस्टल रंगांचा पर्यायही तुम्ही निवडू शकता. तुम्ही सध्या सुरू असलेल्या ट्रेंडमधील डिझाइन्स किंवा पॅटर्न्सचा पर्याय निवडू शकता; परंतु ते तुमच्या स्टाइलशी आणि शरीराशी जुळणारे असावे. त्यामुळे आपण या गोष्टींचा विचार न केल्यास आंधळेपणाने ट्रेंड फॉलो केल्यास तुमची फॅशन बिघडू शकते. मला सुदैवाने अनेक रंग खूप चांगले दिसतात, त्यामुळे जवळपास सर्व रंगांचा वापर करते; पण निवड करताना विविध गोष्टींचा विचार करते. पार्टीत जायचे असेल तर मी उजळ आणि रंगीत कपडे पसंत करते; कारण त्यामुळे पार्टीचा मूड चांगला होतो. रोजच्या वापरासाठी मी हलके आणि पेस्टल रंग वापरते.

प्रियंका चोप्रा कायम माझी फॅशन आयकॉन होती आणि पुढेही राहील. ती स्टायलिश, क्लासी, प्रयोगशील आहे आणि ती भारतीय आणि वेस्टर्न कपडे सुंदर पद्धतीने कॅरी करते. मला आणखी एका अभिनेत्रीची स्टाइल आवडायची ती म्हणजे श्रीदेवी. मला त्या बालपणी विशेषतः आवडायच्या. मला त्या खूप ग्रेसफुल, धमाल आणि क्लासी वाटायच्या. त्यामुळे मी कायम त्यांची चाहती होते.

फॅशन टिप्स

  • स्टाइलपेक्षा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे कम्फर्टेबल कपडे निवडा.

  • ट्रेंड्सचा अवलंब करणे महत्त्वाचे नाही. अनेक जुन्या क्लासिक स्टाइल्स परत आल्या आहेत.

  • तुमच्यामधील सर्वोत्तम गोष्ट जगापुढे आणणारे कपडे घाला.

  • तुमचे दिसणे आणि स्टाइलमध्ये प्रयोगशीलता ठेवा; पण अती करू नका. सीझन आणि निमित्त यांच्यानुसार कपडे, रंग आणि अ‍ॅक्सेसरीजची निवड करा.

  • साधेपणाच स्टायलिश आहे. ओव्हरड्रेसिंग टाळून तुमची स्टाइल विकसित करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Web Title: Shubhangi Atre Writes My Fashion Accessories

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :FashionWomens Corner
go to top